navneet rana visits field | Sarkarnama

खासदार नवनीत राणांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

अरुण जोशी
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ. नवनीत रवि राणा यांनी आज शनिवार रोजी केली. 

अमरावती - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ. नवनीत रवि राणा यांनी आज शनिवार रोजी केली. 

खासदार सौ. नवनीत राणा शनिवार रोजी भातकुली तालुक्यासह दर्यापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली असून या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही राणा यांनी यावेळी साधला. शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्या संदर्भात कृषी विभागाला निर्देश ही यावेळी खासदार राणा यांनी दिलेत. या दौऱ्यात खासदार महोदया सोबत कृषी विभागाचे संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

या वेळी खासदार नवनीत राणा यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून त्याचा अहवाल पाठवला जाईल तसेच वरिष्ठस्तरावर आपण स्वतः याचा पाठपुरावा करून शेतकऱयांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख