नवनीत राणांच्या जातीचा मुद्दा उच्च न्यायालयात 

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने काल त्यांना नोटीस बजावली आहे. राणांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
नवनीत राणांच्या जातीचा मुद्दा उच्च न्यायालयात 

नागपूर : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने काल त्यांना नोटीस बजावली आहे. राणांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 

माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनुसार अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. पण, नवनीत राणा या "लुहाणा' जातीच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे.

असे असतानाही बनावट दस्तऐवजाच्या आधारावर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही मतदारांची फसवणूक असून त्यांची निवड अवैध आहे. त्यांची निवड रद्द ठरवण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. राघव कविमंडन यांनी बाजू मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com