नवनाथ पडळकर 'वंचित' आघाडीतून बाहेर!

आमचा एकच हेतू होता,वंचितांना सत्ता मिळाली पाहिजे. पण आम्ही ज्या हेतूने एकत्र आलो तो हेतू साध्य होताना दिसत नाही.
navnath padalkar left vanchit bahujan aaghdi
navnath padalkar left vanchit bahujan aaghdi

पुणे : बारामती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या नवनाथ पडळकर यांनी प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आहे. आज त्यांच्यासोबत धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर यांच्यासह एकूण सत्तेचाळीस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वंचितला राम राम ठोकला आहे.

बारामती लोकसभा निवडणूक नवनाथ पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढवली होती. ते वंचित आघाडीतील धनगर समाजाचा चेहरा म्हणून राज्यभर फिरत होते. त्यानी सत्ता संपादन मेळावे घेण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्यावर पक्षाने महासचिवपदाची जबाबदारी दिली होती.

याबाबत पडळकर म्हणाले,"वंचित बहुजन आघाडी उभा करण्यात आम्ही सगळे होतो. आमचा एकच हेतू होता,वंचितांना सत्ता मिळाली पाहिजे. पण आम्ही ज्या हेतूने एकत्र आलो तो हेतू साध्य होताना दिसत नाही. वंचित आघाडीत वंचितच वंचित राहिला आहे." असे ते म्हणाले.

"नेते कमी पडले का आम्ही कमी पडलो याचा विचार करत आहोत. पण पक्षात थांबून काही सकारात्मक घडत नसेल तर काय करणार? पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. उद्देश बाजूला पडले आहेत. पक्ष जर वंचितांना सत्तेत घालवू शकत नसेल तर पक्षात का थांबायचं?" असा सवाल यावेळी पडळकर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com