We will win Vasai-Virar Municipal Corporation Election says Bjp MLA Prasad Lad
We will win Vasai-Virar Municipal Corporation Election says Bjp MLA Prasad Lad

वसई-विरार महापालिकेत सत्तेसाठी प्रसाद लाड यांनी ठोकला शड्डू

आगामी पालिका निवडणुकीत विरोधकांकडून सत्ता खेचून आणण्यासाठी पक्षाकडून सर्व 115 जागा लढविण्यात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे.

वसई : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेत निवडणुकीचे शंख फुंकले. आगामी पालिका निवडणुकीत विरोधकांकडून सत्ता खेचून आणण्यासाठी पक्षाकडून सर्व 115 जागा लढविण्यात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. 

शहरामध्ये महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. बहुजन विकास आघाडीसह शिवसेना, भाजप व इतर पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने प्रसाद लाड यांची नुकतीच निवडणुक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर लाड यांनी रविवारी शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. बैठकीत कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांनी सद्यस्थिती जाणून घेतली.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लाड यांनी महापालिकेत यावेळी परिवर्तन होणारच, असा विश्वास व्यक्त केला. लाड म्हणाले, आम्ही परिवर्तनाचा ध्यास घेऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार आहोत. रस्ते, परिवहन सेवा, डंपिंग ग्राउंड, 29 गावांचा मुद्दा असे अनेक प्रश्न घेऊन लोकांच्या हितासाठी ही निवडणूक लढवणार आहे.

सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका त्यांनी केली. महापालिका आयुक्त हे शिवसेनेचे शाखा प्रमुख असल्यासारखे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे महापालिकेत वर्चस्व राहिले आहे. सत्ता राखण्यासाठी स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनीही कंबर कसली आहे. तर शिवसेनेकडूनही आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ठाकूर यांच्या समर्थकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com