गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिला दणका

भाजप नेते आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिला दणका
Ganesh Naik Latest News Updates, Rupali Chakankar News UpdatesSarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणात नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्यावर धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक टाळण्यासाठी नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. धमकावल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने नाईक यांना गुरूवारी दिलासा दिला नाही. त्यावर 27 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तर शुक्रवारी त्यांच्या बलात्काराच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे नाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Ganesh Naik Latest News Updates, Rupali Chakankar News Updates
सिब्बलांनी अर्णब गोस्वामींच्या निकालाची ढाल वापरली, तरीही मलिक तुरूंगातच राहणार!

दरम्यान, नाईक यांना जामीन मिळाल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पीडित महिलेनं गुरूवारी व्यक्त केली होती. पीडित महिलेनं एका व्हिडीओमार्फत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, नाईक यांना अटकपूर्व जामीन मिळाला तर माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे.. माझं अपहरण करून माझ्याकडून काहीही लिहून घेऊ शकतात. सरकारने आतापर्यंत मला खूप मदत केली आहे. मला जनतेच्या सहकार्याची गरज आहे, असं आवाहन या महिलेने व्हिडिओ द्वारे केलीय.

दरम्यान, या महिलेच्या तक्रारीवरून नाईकांच्या विरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नाईकांना त्वरित अटक करा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत. महिला आयोगाने निर्देश दिले असले तरी नाईक यांना लगेच अटक होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमारसिंह यांनी गणेश नाईक यांना तातडीनं अटक होण्याची शक्यता फेटाळून होती. त्यांनी म्हटले होतेे की, गणेश नाईकांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या महिलेच्या जबाबांची तपासणी आम्ही करीत आहोत. त्यांची सत्यता तपासण्यात येत आहे. ही तपासणी झाल्यानंतर आम्ही कायद्यानुसार योग्य कार्यवाहीचे पाऊल उचलू.

Ganesh Naik Latest News Updates, Rupali Chakankar News Updates
भारनियमनावर अजितदादा म्हणाले, आता छत्तीसगडमध्ये कोळशाची खाण घेणार!

या महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही, या महिलेला व तिच्या मुलाला पोलिसांनी सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार नाईकांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही तिने केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाईक यांना त्वरीत अटक करावी, असे निर्देश त्यांनी दिले होते.

संबंधित महिलेने याबाबत नुकतीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे धाव घेतली होती. नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे. नाईक हे 1993 पासून माझे लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच ठार मारण्याची धमकी देऊन माझे शोषण केले, असे या महिलेने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.