SC Final Decision On ShivSena: झिरवळ की सोळा आमदार ; SC कोणाचा E-mail ग्राह्य धरणार

Supreme Court Hearing : सोळा आमदारांनीही E-mail व्दारे नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.
Supreme Court Hearing
Supreme Court HearingSarkarnama

SC Hearing On Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्तासंघर्षावर दोन तासातच सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर या शिंदेसह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी E-mail द्वारे बजावली होती. त्यानंतर या सोळा आमदारांनीही E-mail व्दारे नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.

आजच्या निकालात न्यायालय आता त्या सोळा आमदारांच्या की झिरवाळ यांच्या E-mailला ग्राह्य धरुन त्यावर शिक्कामोर्तब करणार हे लवकरच समजेल.शिवसेनेत बंड झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी बैठकीता व्हिप बजावला होता.

Supreme Court Hearing
Supreme Court Final Decision : आज फैसला : ठाकरे गट-शिंदे गटाची धाकधुक वाढली..; आत्तापर्यंत काय घडलं, सविस्तर वाचा

याबाबतचा मेल त्यांनी पाठवला होता. पण या सोळा आमदारांनी या मेलला केराची टोपली दाखवली होती. या सोळा आमदारांनी "आम्ही बाहेर असल्याने बैठकीला हजर राहू शकत नाही," असा मेल त्यांना केला होता. झिरवाळ यांच्याविरोधातील या १६ आमदारांनीअविश्वास ठराव E-mail द्वारे पाठवला होता.

"सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निर्णयाबाबत आम्ही आशादायी आहोत. आमच्या सरकारला काहीही होणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहिली पाहिजे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही सगळं कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, ही अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टात सुमारे 9 महिने चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. शिवसेनेच्या सोळा बंडखोर आमदारांच्या निलंबनावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल येणार आहे. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले. (Political Web Stories)

Supreme Court Hearing
Sanjay Raut on Maharashtra politics: सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट; 'काय झाडी ,काय डोंगर...'

बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपसभापतींकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगितीची मागणी केली होती. एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे होते की, काही आमदारांनी उपाध्यक्षांवर आधीच अविश्वास प्रस्ताव आणला आहे, त्यामुळे ते आमदारांच्या निलंबनाबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com