पनवेलमध्ये बारवर छापा; बारबालांसह ३२ जण ताब्यात..

पथकाने शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास छापा मारला. आतमध्ये बारबाला व ग्राहकांचे अश्लील चाळे सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पनवेलमध्ये बारवर छापा; बारबालांसह ३२ जण ताब्यात..
Panvel Bar Raid News

पनवेल : कोरोना निर्बंध शिथिल होताच नवी मुंबई आणि पनवेलमधील बारचालकांनी जोरदार ‘छम छम’ला सुरुवात केली आहे. (Raid on bar in Panvel; 32 people including Barbal in custody) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पनवेलमधील टोपाझ बारवर शुक्रवारी रात्री छापा मारला.  

या कारवाईत १४ बारबाला, १० ग्राहक तसेच बारमालक, व्यवस्थापक, सहा वेटर अशा एकूण ३२ जणांवर कारवाई केली. पनवेलमधील कोन गावातील साईनिधी (टोपाझ) ऑर्केस्ट्रा बार रात्री १० वाजता बंद केल्यानंतर ग्राहकांसाठी हा बार गुप्त पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. ( Raid On Panvel Baar, Maharashtra)

याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनावणे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास छापा मारला. आतमध्ये बारबाला व ग्राहकांचे अश्लील चाळे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी १४ बारबाला, सहा पुरुष वेटर, बारमालक, मॅनेजर, १० ग्राहक अशा एकूण ३२ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.