टोपेंच्या आदेशानंतर खासगी रुग्णालयांवर छापे झाले सुरू : या शहरात झाली पहिली कारवाई

पनवेल महापालिका हद्दित महिन्यात सात हजारांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 176 जणांना जीव गमवावा लागला आहे. महापालिका हद्दीत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि कामोठे एमजीएम रुग्णालय वगळता इतर ठिकाणीही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी पालिकेने कळंबोली, खारघर येथील खासगी रुग्णालयांना उपचार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी गैरफायदा घेत रुग्णांकडून अवाच्या सव्वा बिले आकारण्यात येत आहे.
rajesh tope.
rajesh tope.

नवी मुंबई : कोरोना साथीच्या बिकट काळातही रुग्णांची लूटमार करणाऱ्या पनवेलमधील खासगी रुग्णालयांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारच्या कोव्हिड 19 उपचार दर नियंत्रण प्राधिकरणाचे सक्षम अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सात आॅगस्ट रोजी पथकासह अचानक छापा टाकला. राज्य सरकारने सहा आॅगस्ट रोजी खासगी रुग्णालयांवरील खर्चाची पाहणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय झाल्यानंतर पहिल्यांदा पनवेल येथे आॅपरेशन झालेय

या वेळी रुग्णालयांमध्ये सरकारच्या नियमाप्रमाणे दर्शनी भागात दरपत्रक नव्हते. रुग्णालयातर्फे रुग्णांना दिली जाणारी बिले तपासणीसाठी लेखापरिक्षकाची नियुक्ती केलेली नसल्याचे शिंदे यांना आढळून आले. त्यामुळे रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना शिंदे यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना केली आहे. दरम्यान, या पुढेही अशा प्रकारे रुग्णालयांवर छापे टाकण्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत.

पनवेल महापालिका हद्दित महिन्यात सात हजारांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 176 जणांना जीव गमवावा लागला आहे. महापालिका हद्दीत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि कामोठे एमजीएम रुग्णालय वगळता इतर ठिकाणीही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी पालिकेने कळंबोली, खारघर येथील खासगी रुग्णालयांना उपचार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी गैरफायदा घेत रुग्णांकडून अवाच्या सव्वा बिले आकारण्यात येत आहे.

या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत; परंतु कारवाई होत नव्हती. त्यामुळे काही नागरिकांनी सुधाकर शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत शिंदे पथकासह कळंबोलीतील सुश्रूत, सिद्धिविनायक, आशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि खारघर सेक्‍टर 20 मधील पोलारिस हॉस्पिटलला अचानक भेट दिली. त्यावेळी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसले.

रुग्णालयांमध्ये सरकारच्या नियमाप्रमाणे दर्शनी भागात दरपत्रक नव्हते. रुग्णालयातर्फे रुग्णांना दिली जाणारी बिले तपासणीसाठी लेखापरिक्षकाची नियुक्ती केलेली नसल्याचे शिंदे यांना आढळून आले. त्यामुळे रुग्णांना दिली जाणारी बिले कशावरून वाढवून दिली नसतील, असा प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केला. कारवाई दरम्यान शिंदे यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला चांगलेच फैलावर घेतले.

रुग्णालयांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असतानाही पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याचे पाहून शिंदे यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कामाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या चारही रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सखोल अहवाल सादर करण्याची सक्त ताकीद शिंदे यांनी देशमुख यांना केली आहे. चारही रुग्णालयांनी रुग्णांकडून वसूल केलेली बिले तपासण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

पनवेल महापालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयांबाबत आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून आज अचानक भेट दिली असता कळंबोली आणि खारघरमधील रुग्णालयांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निष्पन्न झाले. महापालिकेला या प्रकरणी आयुक्त सुधाकर देशमुख यांना सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. सुधाकर शिंदे, कोव्हिड 19 उपचार दर नियंत्रण प्राधिकरण, सक्षम प्राधिकृत अधिकारी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com