लोकांचा लोकनाथ एकनाथ... डोंबिवलीत शिंदेना पाठिंबा दर्शविणारे बॅनर

मनसेतून Manse शिवसेनेत Shivsena प्रवेश केलेले उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, दिपक भोसले, राजेश मुणगेकर यांनी हे फलक लावले असून शिंदे Eknath Shinde यांना शुभेच्छा दर्शवित पाठिंबा दिला आहे.
Dombivali Banners
Dombivali Bannerssarkarnama

डोंबिवली : राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालीनंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षनिष्ठा की एकनाथ शिंदे असा पेच शिवसैनिकांना पडला असतानाच डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शविणारे बॅनर इंदिरा चौकात लावण्यात आला आहे. लोकांचा लोकनाथ एकनाथ... शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा...साहेब आगे बढो, हम आपके साथ है...असा संदेश त्यावर देण्यात आला आहे.

मनसेतून शिवसेनेत आलेल्या शिवसैनिकांनी हे बॅनर लावले असून डोंबिवलीतील शिवसैनिकांनी मात्र अद्याप या घडामोडींवर मौन बाळगले असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून राज्यातील राजकारणात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व ठाणे जिल्ह्यात आहे.

Dombivali Banners
शिवसेना आक्रमक; बंडखोरांना संध्याकाळी पाचपर्यंत मुदत; अन्यथा कारवाई

शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई, नवी मुंबई परिसरातील शिवसैनिकांनी शिंदे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत आवाज उठविला मात्र ठाणे जिल्ह्यात याच्या उलट वातावरण असून सर्व शाखांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे. शिवसैनिकांची पक्षाशी एकनिष्ठा असली तरी शिंदे यांना मानणारा वर्ग येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता पक्षनिष्ठा की शिंदे साहेब या दोलायमान भूमिकेत शिवसैनिक अडकला आहे.

Dombivali Banners
अखेर कन्फर्म झालं...एकनाथ शिंदेंसोबत ३७ आमदार, ठाकरे सरकार पडणार?

त्यातच बुधवारी दुपारी डोंबिवलीतील इंदिरा चौकात झळकलेल्या एका बॅनरने मात्र साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, दिपक भोसले, राजेश मुणगेकर यांनी हे फलक लावले असून त्यावर शिंदे यांना शुभेच्छा दर्शवित पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

Dombivali Banners
शिंदेंसोबत असलेल्या नऊ आमदारांच्या अपहरणाची कुटुंबीयांकडून तक्रार! मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर

यावर केवळ याच पदाधिकाऱ्यांची नावे असून इतर कोणाचीही नावे नसल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ शिवसैनिक याविषयी बोलण्यास तयार नसून डोंबिवली शहर प्रमुख देखील नॉट रिचेबल आहेत. शिवसैनिकांनी यावर अद्यापही मौन बाळगळे असून पक्षात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dombivali Banners
छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांना असे प्रसंग नवीन नाहीत

काय आहे फलकावरील संदेश

लोकांचा लोकनाथ एकनाथ शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा.साहेब आगे बढो, हम आपके साथ है.

Dombivali Banners
शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची ? ; कायदा काय सांगतो..

कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी राहणारे एकनाथ शिंदे आहेत. परभणी, जालना, सातारा, बीड याठिकाणी आम्ही त्यांचे काम स्वतः पाहिले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र याठिकाणी राष्ट्रवादी शिवसैनिकांना उभे करत नाही, असा आरोप कल्याणचे शिवसेनेच उपजिल्हा प्रमुख राजेश कदम म्हणाले, खासदार, आमदारांना यांना कामासाठी निधी दिला जात नाही, एवढा असंतोष आम्ही कार्यकर्त्यांनी पाहिला आहे.

Dombivali Banners
दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

या सर्व तक्रारींना वाचा फोडण्यासाठी तेथील कार्यकर्त्यांसाठी शिवसेनेसाठी शिंदे यांनी हे पाऊल उचलले आहे. डोंबिवलीच्या विकासाची गती ही पालकमंत्री शिंदे यांच्यामुळेच आहे. अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे हे आम्हाला भागच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची विकास कामांची गती पाहूनच आम्ही पक्षात आलो आहोत. ते नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहीले असून आज आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com