शिवसेनेचा गणेश नाईक यांच्या विरोधात बंडाचा झेंडा; शहर प्रमुखांचा राजीनामा 

बेलापूर विधानसभेतून माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता असल्याने शिवसैनिकात नाराजी पसरली आहे. बेलापूर विभागाचे नगरसेवक शहरप्रमुख विजय माने यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
Ganesh Naik
Ganesh Naik

नवी मुंबई : बेलापूर विधानसभेतून माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता असल्याने शिवसैनिकात नाराजी पसरली आहे. बेलापूर विभागाचे नगरसेवक शहरप्रमुख विजय माने यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. 

ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमा हटवून गद्दारी केली त्यांचाच प्रचार करायचा असा सवाल करून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ते बुधवारी बेलापूर विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विजय माने यांच्या पाठोपाठ अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे. या बाबत लवकरच वाशी येथील शिवसेना कार्यालयात बैठक घेतली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com