१५ वर्षांनंतर प्रथमच गणेश नाईकांच्या अनुपस्थितीत होणार राष्ट्रवादीची बैठक

माजी आमदार संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुरूवारी (ता.8) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मुख्य पक्षप्रतोद जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आणि नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
१५ वर्षांनंतर प्रथमच गणेश नाईकांच्या अनुपस्थितीत होणार राष्ट्रवादीची बैठक

नवी मुंबई  : माजी आमदार संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुरूवारी (ता.8) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मुख्य पक्षप्रतोद जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आणि नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील उपस्थित राहणार आहेत. 

नेरूळच्या तेरणा महाविद्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 
नाईकांसोबत राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपमध्ये जाणार अशी वल्गना नाईकांच्या समर्थकांकडून करण्यात येत होती. मात्र ५२ पैकी १५ नगरसेवक सध्या भाजपमध्ये न जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहीले आहेत. गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाबाबत तारिख निश्‍चित झालेली नाही. तसेच नाईकांकडूनही मौन सुटलेले नाही. त्यामुळे बहुतांश नगरसेवक भाजपमध्ये जावे की राष्ट्रवादीतच रहावे याबाबत अद्याप निर्णय घेऊ शकलेले नाहीत. 

नगरसेवकांमध्ये संभ्रामवस्था निर्माण झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. नाईकांच्या मर्जीतील जिल्हाध्यक्ष अनंत सूतार यांना पायउतार करून नगरसेवक अशोक गावडे यांची नवीन जिल्हाध्यक्षपदी निवडून राष्ट्रवादीने नाईकांना पहिला धक्का दिला आहे. आता बैठक घेऊन त्यापाठोपाठ भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वाट अडवण्याचे काम केले जाणार आहे. या बैठकीत नवी मुंबईतील पक्षबांधणी व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भर दिला जाणार आहे. तसेच पक्षाची पूढील भूमिका देखील ठरवण्यात येणार आहे. 

या बैठकीनंतर पहिल्यांदा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मोठा कार्यकर्ता मेळावा घेण्याच्या तयारीत राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी आहेत. त्यामेळाव्याची रूपरेषा देखील ठरवण्याची शक्‍यता आहे. गेल्या १५ वर्षानंतर पहिल्यांदाच गणेश नाईकांशिवाय ही बैठक होणार असल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेवर आत्तापर्यंत १५ नगरसेवक ठाम आहेत. हा आकडा वाढवण्याचा राष्ट्रवादीचा या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com