मोठी बातमी : पिंपरी-चिंचवड, नागपूर, नवी मुंबई, ठाणे पोलिस आयुक्तपदासाठी झाले होते 'डील'

गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालातून पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.
Deal for Pimpri Chinchwad Nagpur Navi Mumbai Thane Police Commissioner post
Deal for Pimpri Chinchwad Nagpur Navi Mumbai Thane Police Commissioner post

मुंबई : गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालात पोलिस दलातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे सादर करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यातच अहवालातील काही अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहे. या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे व नागपूर पोलिस आयुक्तपदासाठी पैशांची देवाणघेणाण केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत अहवालातील काही नावे उघड केली आहेत. मलिक यांनी सांगितले की, त्यावेळचे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्त पदासाठी, संजय वर्मा हे अपर पोलिस महासंचालक, व्हिजिलन्स, म्हाडा या पदावर असताना ठाणे पोलिस आयुक्त पदासाठी तर अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) विनय चौबे यांनी नागपूर किंवा पुणे पोलिस आयुक्त पदासाठी पैशांची देवाणघेणाव केल्याचे अहवालात म्हटले आहे. पण या चौघांचीही त्याठिकाणी बदली झालेली नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली. 

अहवालातील ही नावे पहिल्यांदाच समोर आली आहेत. तसेच आणखी काही अधिकाऱ्यांची नावे या अहवालात आहेत. हा अहवालच फडणवीस गृहसचिवांकडे सादर करणार आहेत. पण मलिक यांनी हा अहवाल  खोटा असल्याचा दावा केला आहे. अहवातात समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांपैकी ८० टक्के जणांची अहवालात म्हटल्याप्रमाणे बदली झालेली नाही. रश्मी शुक्ला यांनी कुणाचीही परवानगी न घेता फोन टॅप केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस म्हणाले, "वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी काम करणारे एक रॅकेट मंत्र्यांचे नाव वापरते आहे. बदल्यांबाबत पोलिसांबरोबर थेट बोलणे होत आहे, अशी माहिती शुक्ला यांना मिळाली होती. नियमानुसार महासंचालकांनी एसीएस होम यांच्याकडे फोन इंटरसेप्शनची परवानगी मागितली. जेव्हा काॅल रेकाॅर्डिंग सुरु झाले त्यावेळी स्फोटक माहिती समोर आली. या साऱ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल शुक्ला यांनी २५ आॅगस्ट २०२० रोजी महासंचालकांना दिला. महासंचालकांनी २६ तारखेला त्यावेळी तत्कालिन गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव सीताराम कुंटे यांना पाठवला."

फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगेच पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पलटवार केला. गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री थेट कोणत्याही बदल्या करत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र मंडळ असते. त्यामुळे फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. फोन टॅपिंगसाठी त्यांनी कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. त्यांनी महाराष्ट्रात सरकार बनविण्याचे संकट असताना त्यांनी सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या, असा आरोप मलिक यांनी केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com