#CoronaEffect नवी मुंबई महापालिका निवडणुकीवर कोरोनाचे सावट?

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणूकीवर संकट उभे राहीले आहे. कोरोना व्हायरस निदान झालेले दोन रुग्ण मुंबईत सापडल्यामुळे मुंबईसह नवी मुंबई परिसरातही खळबळ माजली आहे
Navi Mumbai Elections May Hamper Due to Corona
Navi Mumbai Elections May Hamper Due to Corona

नवी मुंबई  : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणूकीवर संकट उभे राहीले आहे. कोरोना व्हायरस निदान झालेले दोन रुग्ण मुंबईत सापडल्यामुळे मुंबईसह नवी मुंबई परिसरातही खळबळ माजली आहे. यादरम्यान एप्रिल महिन्यातील निवडणूकीसाठी होणाऱ्या प्रचार सभा, रॅली आणि इतर कार्यक्रमांमध्ये जमणारी गर्दी पाहता कोरोना व्हायरस आणखीन बळावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निवडणूका पुढे ढकलण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र याला सरकारी दुजोरा मिळू शकला नाही.

राज्यात कोरोना व्हारसचा होत असलेला फैलाव रोखण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएल सामने खेळवायचे की नाहीत याबाबत राज्य सरकार साशंक आहे. हे सामने खेळवल्यास स्टेडीयममध्ये प्रेक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून हे सामने प्रक्षेपणावर अधिक भर देऊन प्रेक्षकांना एकत्र न येऊ देण्याची व्युव्हरचना सरकारने आखली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 

मात्र एप्रिल महिन्यात महापालिकेच्या निवडणूका होणार असल्यामुळे या निवडणूकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सभांना गर्दी होणार आहे. तसेच उमेदवारांसाठी घेतल्या जाणाऱ्या कॉर्नर सभा, घरोघरी जावून केला जाणारा प्रचार, आदी सर्व बाबींमध्ये नागरीकांचा थेट संबंध येणार आहे. एका व्यक्तींचा अनेक व्यक्तींशी संबंध आल्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास अधिक पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता पाहता सरकारकडून निवडणूका पूढे ढकलण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे समजते आहे. 

निवडणुका पूढे ढकलण्यासाठी काही महत्वांच्या विभागातील अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जात असल्याचे समजते. 9 मेला महापालिकेची मुदत संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर निवडणुका घेतल्यास पालिकेचा कारभार चालवण्यासाठी प्रशासक बसवावा लागणार आहे. परंतु, मे नंतर पावसाचे दिवस सुरू होणार असल्याने कोणती वेळ सोयीचा असेल याबाबत चाचपणी सुरू असल्याचे समजते आहे.

13 संशयित रुग्णांवर उपचार करून सोडले

नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत परदेशातून आलेल्या कोरोनाच्या 13 संशयित रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आले आहेत. 6 चीन, 2 इराण, 3 दुबई, 1 जर्मनी आणि एक नवी मुंबईतील असे एकूण 13 जण कोरोना व्हायरसची लागण नसलेले संशयित होते. परंतू आता महापालिकेचे आरोग्य विभाग त्यांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com