मराठा आरक्षणाची लढाई संपेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : देवेंद्र फडणवीस - Will not rest until the battle of Maratha reservation ends says Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणाची लढाई संपेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अण्णासाहेब पाटील यांना वाहिली आजरांजली 

मुंबई : मराठा आरक्षणाची अंतिम लढाई जोवर संपणार नाही, तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या सरकारच्या काळात जे आरक्षण दिले गेले, ते उच्च न्यायालयात टिकले, हे मला आवर्जून सांगितले पाहिजे. आताही या लढाईत आम्ही सोबत आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले. 

माथाडी कामगारांचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी भवन, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे बोलत होते त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :

-माथाडी कामगारांच्या कायद्याच्या माध्यमातून असंघटित कामगारांना अनेक योजना लागू झाल्या. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली. यामुळे माथाडी कामगारांना प्रतिष्ठा मिळाली.

-पूर्वी देशात 28 कामगार कायदे होते. त्यात प्रचंड विसगंती होती.त्याला आता केवळ 3 कायद्यांमध्ये परावर्तित केले आहे.
या नव्या कायद्यांमुळे संघटितसोबतच असंघटित कामगारांना संरक्षण मिळणार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी संरक्षण कवच उभे केले आहे.

-कृषीमाल नियमनमुक्तीच्या कायद्यासंदर्भात सुद्धा अनेक गैरसमज आहेत. शंकाकुशंका कितीही निर्माण केल्या, तरी वास्तविकता समजून घेतली पाहिजे. त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतील. केवळ राजकारण करण्यात अर्थ नाही. कृषी विधेयकावर फक्त राजकारण केल जात आहे. हे दुटप्पी आहे. काँग्रेस ने त्यांच्या जाहीरनाम्यात नियमनमुक्तीच आश्वासन दिलं होतं. कृषी विधेयकाची अंमलबजावनी न करणे हे शेतकरी विरोधी आहे.  शेतकरी यांच उत्तर देतील. राज्य सरकार ला अंमलबजावनी करावी लागेल.

बिहार निवडणूकीत भाजपला विजय मिळेल आम्हांला विश्वास आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख