मंत्र्याचे नाव वापरून गोंधळ घालत थेट हफ्तावसुली

नवी मुंबईचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने मंत्रालयातील नेत्यांचे फावले...
Navi Mumbai corporation
Navi Mumbai corporation

नवी मुंबई : मंत्र्यांच्या नावाच्या जोरावर अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घालून हप्ते वसुली करण्याचा नवा अध्याय नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिकेत सुरू झाला आहे. विशेष म्हणजे याला राज्यातील बडे नेते, मंत्री खतपाणी घालत असल्याने महापालिकेचे अधिकारीही हतबल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका प्रादेशिक पक्षाच्या स्थानिक नेत्याच्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या आरोपातून महापालिकेत गोळा होणाऱ्या लाखो रुपयांच्या वसुलीची पोलखोल झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा आता महापालिकेकडे वळल्या आहेत. (Ransom recovery in the name of minister in Navi Mumbai corporation) 

राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक ही ओळखच आता महापालिकेच्या अंगलट येऊ लागली आहे. आस्थापनेवरील खर्च कमी असल्याने इतर प्रकल्पांवर पालिकेला खर्च करण्यासाठी मुबलक पैसा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत पालिकेवर लोकप्रतिनिधींची कमिटी नसल्याने प्रशासकांच्या अधिकार क्षेत्रात सर्व कारभार चालवला जात आहे.

सध्या महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून तुंबलेल्या पदोन्नती आणि वेतनवाढीचे वारे वाहत आहेत. याआधीच्या अधिकाऱ्यांनी फक्त स्वकेंद्रीत काम केल्यामुळे १० वर्ष जुने अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असणारे अधिकारी व कर्मचारी वाटेल ते किंमत मोजण्यास तयार आहेत. कामगार संघटनांच्या प्रयत्नांमुळे ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन देण्याचा प्रस्तावावर महापालिकेला निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कामगारांकडून वेतन वाढीच्या नावावर श्रेयासोबतच अर्थकारण देखील चालवता येतील.

एखाद्या विकासकामांवर केलेल्या खर्चाचे आरटीआय टाकून त्याआड अधिकाऱ्यांना दबावातंत्राने हप्तेखोरी करण्याची परंपरा गेली अनेक वर्षे सुरुच आहे. यात आता भर म्हणून अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पळवून दबावतंत्र पाडण्याचे नवा पायंडा पाडला जात आहे. अशा वृत्तीला चाप बसणे काळाची गरज झाली आहे. नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दालनात बसणे कठीण होईल अशी भीती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

गुन्हा दाखल
महापालिकेचे अधिकारी हे जनतेचे काम करण्यासाठी आहेत. जनतेचे काम घेऊन येणाऱ्यांसोबत ते चर्चा करतील. तसेच तोडगाही काढण्याचा प्रयत्न करतील. पण हे सर्व मार्ग संविधानिक असायला हवेत. असांविधानिक मार्गाने केलेले प्रयत्न खपवून घेणार नाही. खुर्ची पळविण्याच्या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या नेते मंडळींवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com