नगरसेवक नजीब मुल्लांच्या कार्यालयाची तोडफोड : मनसे पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी आरोपीने घेतले नाव - office of najjeb Mulla attacked by supporters of Jameel Sheikh | Politics Marathi News - Sarkarnama

नगरसेवक नजीब मुल्लांच्या कार्यालयाची तोडफोड : मनसे पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी आरोपीने घेतले नाव

विकास काटे
शनिवार, 3 एप्रिल 2021

राबोडीतील वातावरण तंग 

ठाणे : ठाण्यातील मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशातून एका आरोपीला आज अटक करण्यात आली. इरफान शेख हा आरोपी असून त्याने ठाण्यातील राष्ट्रवादी नगरसेवकाचे नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक शेख शेख समर्थकांनी आज नगरसेवर नजीब मुल्ला यांच्या कार्यालयावर हल्ला केला. 

उत्तर प्रदेशातील पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. आरोपीने राष्ट्रवादी नगरसेवकाच्या नावाचा उल्लेख केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये म्हटले होते. त्यामुळे राबोडीत वातावरण तंग झाले होते. अखेर संध्याकाळी जमावाने नजीब मुल्ला यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. सोबत रुग्णवाहिकाही तोडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती आणि राबोडीमधील वातावरण तंग झाल्यानंतर तेथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ठाण्यातील राबोडी येथील मनसे कार्यकर्ते जमील शेख यांच्यावर भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन इस्मानी डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. 23 नोव्हेंबर 2020 रोजी ही हत्या झाली. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने 25 नोव्हेंबर 2020 रोजी पहिला आरोपी ठाण्यातील राबोडी येथून अटक केला होता. तो पकडलेला आरोपी शाहिद शेख असून तो सध्या ठाणे तुरुंगात आहे.  दुसरा आरोपी  इरफान सोनू शेख मनसुरी याने दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यार गोळ्या झाडल्या होत्या. मनसुरी याला आज मध्ये लखनौच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. याबाबत तेथील पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. लखनौ न्यायालयाच्या परवानगीनंतर ठाणे पोलिसांकडे आरोपीचा ताबा देण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. दोन लाखांची सुपारी घेऊन हा खून करण्यात आला होता. खूनामागील कारण अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेल नाही.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख