कर्जत : रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांची पक्षाने उचलबांगडी केली आहे. या ठिकाणी पक्षाचे निष्ठावंत व खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
मसुरकर यांनी अलीकडे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मसुरकर यांना हटविण्याची मागणी कर्जत, खालापूर, खोपोलीमधील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षाकडे केली होती. अनेक वेळा कार्यकर्त्यांनी जाहीर खडखड देखील व्यक्त केली होती. अखेर पक्षाला त्याची दखल घ्यावी लागली. पक्षाने लाड यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. हे पत्र खासदार सुनील तटकरे यांचे हस्ते लाड यांना देण्यात आले
लाड यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोर लावला होता. रंतु पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केले. लाड हे लवकरच नवीन कार्यकारिणी घोषित करणार असून यामध्ये कोणाची वर्णी लागेल येत्या काळामध्ये दिसून येईल. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे क्षामध्ये बोललं जाते. त्यामुळे कर्जत खालापूर खोपोली या परिसरातील अशा बेशिस्त कार्यकर्त्यांवर ते जिल्हाध्यक्ष म्हणून कारवाई करणार का, याची उत्सुकता राहील.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.