उल्हासनगरवर वर्चस्व ठेवलेल्या ज्योती कलानी यांचे निधन - former MLA Jyoti Kalane dies at 70 years | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

उल्हासनगरवर वर्चस्व ठेवलेल्या ज्योती कलानी यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 एप्रिल 2021

पप्पू कलानी तुरुंगात असतानाही ज्योती या सक्रिय होत्या. 

उल्हासनगर : येथील च्या माजी आमदार ज्योती कलानी यांच आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शहरातील `आयर्न लेडी`, `शहराची भाभी` म्हणून त्यांची ओळख होती. त्या 70 वर्षाच्या होत्या.

एक शांत स्वभावी राजकारणी, सदा हसतमुख असणाऱ्या कलानी यांनी उल्हासनगरवर कलानी कुुटुंबाचे वरचष्मा ठेवला होता. त्या सन २०१४ ते २०१९ त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाच्या  आमदार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून त्या उल्हासनगर राष्ट्रवादी काँगेसच्या जिल्हाध्यक्षा होत्या. त्यांचे पती पप्पू कलानी हे गेल्या 14 वर्षांपासून एका हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानी अशी राजकीय संघटना तयार केली आहे.

ज्योती कलानी यांना उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँगेस तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून,महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या चार नगरसेवकांनी ज्योती कलानी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. ज्योती कलानी यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख