अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात कुरुंदकरसह खडसेंच्या भाच्याला न्यायालयाचा दणका

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाची सुनावणी पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने या आरोपींना पुन्हा एकदा दणका दिला आहे.
court refuse bail plea of accused in ashwini bidre murder case
court refuse bail plea of accused in ashwini bidre murder case

नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील ऊर्फ ज्ञानदेव पाटील यांनी जामिनासाठी केलेला अर्ज पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. याआधी या आरोपींनी केलेले जामीन अर्जही उच्च न्यायालयासह जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले होते.

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, राजू पाटील ऊर्फ ज्ञानदेव पाटील, महेश फळणीकर व कुंदन भंडारी यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केले होते. गेल्या महिन्यात त्यांनी जामिनासाठी अर्ज सादर केले होते. यावर गेल्या आठवड्यात सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आरोपींना जामीन देण्यास विरोध केला. 

आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर असून, या गुन्ह्यात त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते. याचबरोबर मुख्य आरोपी पोलीस अधिकारी असून यातील दोन क्रमांकाचा आरोपी हा राजकीय पक्षाशी निगडित आहे, त्यामुळे या आरोपींची जामिनावर सुटका केल्यास या खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाच्या घरत यांनी निदर्शनास आणून दिले होते.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चालवण्याची घरत यांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जूनला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com