राष्ट्रवादी काँग्रेसची आमदाराला डावलून अपक्षाला रसद; पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे दोन गट  - Two groups of NCP in Palghar Zilla Parishad | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसची आमदाराला डावलून अपक्षाला रसद; पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे दोन गट 

संदीप पंडित
शुक्रवार, 16 जुलै 2021

निलेश सांभरे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाले असल्याने आपल्या माणसाच्या मदतीने जिल्ह्यात परिषदेवरील आपली पकड जाऊ नये, यासाठी ते वेगळा गट करत असल्याचे बोलले जात आहे.

विरार : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये असलेली गटबाजी उफाळून आली असून, प्रदेशमधून मात्र जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या नेत्याला रसद पुरविली जात असतानाच स्वतःचा जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव्य  आमदार असलेल्या सुनील भुसारा यांना डावलले जात असल्याचे समोर आल्याने पालघरमध्ये राष्ट्रवादी  काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाल्याचे चित्र दिसत आहे. Two groups of NCP in Palghar Zilla Parishad

पालघर जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षणातील काही जणांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता नव्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीसाठी गट स्थापनकरून गटनेत्यांची निवड करण्यावरून सद्या राज्यात सत्तेवर असलेल्या राष्टवादी काँग्रेस मध्ये राडा सुरु आहे. या वादाचे केंद्र बिंदू जिल्हा परिषदेत अपक्ष म्हणू निवडून आलेले निलेश सांभरे हे आहेत. 

हेही वाचा : खासदार लग्नात नाचण्यासाठी तंदुरुस्त पण घरी कोरोना लस घेण्यासाठी आजारी!

जिल्हा परिषदेत सांभरे यांनी राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून आणल्याने त्यांचे वजन वाढले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर अपक्ष असलेल्या सांभरे यांना थेट उपाध्यक्ष पदाची लॉटरी लागली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी त्यांनी स्वतःच्या जिजाऊ संघटनेच्या शाखा वाढविण्यात सपाटा लावण्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्यात वाद झाला होता. 

आवश्य वाचा : शिवसेनेने भाजप सोबत असलेली नैसर्गिक युती तोडून; सत्तेसाठी शेण खाल्ले!

आता तर निलेश सांभरे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाले असल्याने आपल्या माणसाच्या मदतीने जिल्ह्यात परिषदेवरील आपली पकड जाऊ नये, यासाठी ते वेगळा गट करत असल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सहा सदस्य व त्यांना पाठिंबा दिलेले एक काँग्रेस सदस्य अश्या राष्ट्रवादीच्या गटस्थापनेसाठी हालचकली सुरु केल्या असून त्याला वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. 
           

निलेश सांभरे हे सद्या वालशिंद प्रकरणात फरार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्री पद असल्याने ते राष्ट्रवादीला धरून असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत हि सांभरे यांच्या मागे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि मंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुनील भुसारा यांना बाजूला सारून ताकद दिली होती. असे असतानाही बँकेवर हितेंद्र ठाकूर पॅनलने २१ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळविला होता. 

त्यात हितेंद्र ठाकूर पॅनेलला पालघरजिल्ह्यातून सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या असे असतानाही पुन्हा एकदा निलेश सांभरे यांना वरिष्ठ देत असलेल्या ब्ला बाबत जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. या बात सुनील भुसारा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गैरसमजातून काही प्रकार झाल्याचे मान्य केले त्यानंतर त्यांनी आम्ही सर्व एक असल्याचे सांगून जास्त बोलण्याचे टाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख