'एक देश, एक कार्ड'साठी रेल्वे सज्ज; नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वर्षभरात

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वर्षभरात वापरात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रेल्वेचा प्रवास ते शॉपिंग असे व्यवहार एकाच कार्डवर करता येतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (ता. 5) अर्थसंकल्पात 'एक देश एक कार्ड' ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
'एक देश, एक कार्ड'साठी रेल्वे सज्ज; नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वर्षभरात

मुंबई  : मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वर्षभरात वापरात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रेल्वेचा प्रवास ते शॉपिंग असे व्यवहार एकाच कार्डवर करता येतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (ता. 5) अर्थसंकल्पात 'एक देश एक कार्ड' ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमुळे मुंबईकरांना रेल्वेच्या तिकिटासाठी खिडक्‍यांपुढे रांग लावावी लागणार नाही. या योजनेसाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प खासगी तत्त्वावर राबवण्यात येणार असून, रेल्वेला निधी खर्च करावा लागणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेतील गुंतवणुकीसाठी खासगी भागीदारीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार उपनगरी मार्गासाठी बॅंकांना आमंत्रित करण्यात येणार असून, खुल्या निविदा मागवण्यात येतील. निविदेत पात्र ठरलेल्या बॅंकेवर उपनगरी रेल्वेच्या तब्बल 80 लाख प्रवाशांना 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' देण्याची जबाबदारी असेल. 

एमआरव्हीसीने तीन आठवड्यांपूर्वी रेल्वे बोर्डाला नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वेमार्गावर येत्या वर्षात ही योजना राबवण्यात येईल. उपनगरी रेल्वेमार्गावरील एकूण 119 स्थानकांत किमान 600 मशीन बसवण्यात येतील. या कार्डवरून दिवसभरात होणाऱ्या तिकीट आणि मासिक पासच्या विक्रीची माहिती रेल्वेला प्रशासनाकडून रात्री संबंधित बॅंकेला दिली जाईल. 

एमआरव्हीसीतर्फे अॅप
या योजनेसाठी एमआरव्हीसीतर्फे मोबाईल अॅप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे प्रवासी आपल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये किती शिल्लक रक्कम आहे, आपले तिकीट कोणते आहे आदी माहिती पाहू शकतील. या कार्डच्या मदतीने प्रवाशांना रेल्वे, बेस्ट बस, टॅक्‍सी, रिक्षाचा प्रवास आणि खरेदी करता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com