काय आहे चिदंबरम प्रकरण? 

एअरसेल-मॅक्‍सिसमधील 3500 कोटींचा करार आणि 305 कोटींचे परकी निधीबाबतचे आयएनएक्‍स मीडिया प्रकरण या दोन्ही प्रकरणांतील गैरव्यवहारात चिदंबरम यांचा सहभाग असल्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा आरोप आहे. आज रात्री माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले.
काय आहे चिदंबरम प्रकरण? 

नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्‍सिसमधील 3500 कोटींचा करार आणि 305 कोटींचे परकी निधीबाबतचे आयएनएक्‍स मीडिया प्रकरण या दोन्ही प्रकरणांतील गैरव्यवहारात चिदंबरम यांचा सहभाग असल्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा आरोप आहे. आज रात्री माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले.

'यूपीए' सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी या दोन्ही कंपन्यांना विदेशातून निधी स्वीकारण्यासाठी परकी निधी प्रोत्साहन मंडळाकडून (एफआयपीबी) परवानगी मिळवून दिली होती. सीबीआयने याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा दावा करीत 15 मे 2017 मध्ये एफआयआर दाखल केला होता. सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) 2018 मध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. आयएनएक्‍स मीडियाचे प्रमुख पीटर मुखर्जी यांना याप्रकरणी सीबीआय कोठडी मिळाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com