national news | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

"कुलभूषण जाधव यांचा ठावठिकाणा माहिती नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नवी दिल्ली ः कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र त्याचे तपशील आता देता येणार नाहीत. तूर्तास पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयामार्फतच हे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून कुलभूषण यांच्या ठावठिकाण्याबाबत भारत सरकारकडे कोणतीही माहिती नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्यांनी मान्य केले. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी आज पत्रकारांबरोबर केलेल्या वार्तालापात या विषयावरील विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. या उत्तरांच्या पुष्टीसाठी त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत केलेल्या निवेदनाचाही आधार घेतला. कुलभूषण जाधव हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. इराणमधील चाबहार बंदर परिसरात ते व्यवसाय करत होते. अचानक त्यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये पकडल्याचे पाकिस्तानतर्फे जाहीर करण्यात आले आणि ते हेरगिरी व घातपाती कारवाया करत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यांचा एक तथाकथित कबुली जबाबही पाकिस्तानतर्फे प्रसारित करण्यात आला होता. भारताने कुलभूषण हे निवृत्त नौदल अधिकारी असल्याचे मान्य केले होते; परंतु ते हेरगिरी करत होते किंवा अजूनही सरकारी नोकरीत होते याचे खंडन करण्यात आले होते, अशी पार्श्‍वभूमी बागले यांनी सांगितली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख