जिल्हा परिषद  अध्यक्ष होईन असे स्वप्नातही नव्हते ! - सौ.शीतल सांगळे 

खंबीर नेतृत्वाची पाठराखणसौ. शीतल सांगळे या औषधनिर्माणशास्त्राच्यापदविधारक व मूळच्या संगमनेर(अहमदनगर) येथील आहेत. सिन्नर येथील युवक कॉंग्रेसचे माजी नाशिक जिल्हाअध्यक्ष उदय सांगळे यांच्याशी त्यांचा2009 मध्ये विवाह झाला. उदय सांगळे सध्या शिवसेनेत आहेत. तालुक्‍यातीलशिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि सांगळे एकत्र काम करीत असून शिवसेना नेते व राज्यमंत्री दादा भुसे यांचा या त्यांना पाठींबा असल्याने त्याअध्यक्षा झाल्या. सध्या हा राजकीय गट जिल्ह्याच्या राजकारणत सर्वाधिकप्रभावी मानला जातो.
z.p. sangle Nasik
z.p. sangle Nasik

नाशिक :  "मी साध्या शेतकऱ्याची लेक आहे. राजकारण कशाशी खातात अन्‌ कशाला म्हणतात मला काहीच माहीत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यावर काही दिवस हे कसे घडले याचाच विचार मनात घोळत होता.कारण कधी स्वप्नातही तसे वाटले नव्हते ते घडले होते. आता शंभर दिवस झाले. त्यामुळे या पदाचा उपयोग खेड्यातल्या महिलांच्या डोक्‍यावरचा हंडा कसा दूर होईल यासाठी करीन. त्यात शंभर टक्के यशस्वी होईनच हा निर्धार आहे," असे सौ. शीतल उदय सांगळे यांनी सांगीतले.

" मी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाते तेव्हा स्वीय सहाय्यक, अधिकारी, प्रश्‍न घेऊन येणारे लोक या सगळ्यांचे काय म्हणणे  आहे ते पूर्ण ऐकते. समजले नाही तर शंका विचारते. आवश्‍यक वाटते तेव्हा पतींचेही मार्गदर्शन घेत काम करते. गेल्या तीन महिन्यात आता मला राजकारण वगळता प्रशासकीय व विकासाच्या कामांना पुढे कसे न्यायचे यातील बरेच काही समजु लागले आहे." 

" आत्मविश्‍वास वाढतो आहे. जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा एक वाक्‍यही बोलायची धास्ती होती. आता मी संबंधीतांना प्रश्‍न विचारु लागले आहे. गरीबाचे काम अडत असले तर त्याचा अडथळा कसा दूर करायचा ते करु लागले आहे. 
महिला आहे. तरुण आहे. याचा अध्यक्षा म्हणून काम करतांना फायदाच होतोय.तोटा नाही. शेवटी राजकारण कळले नाही म्हणून काही अडत नाही असे वाटते." 

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या सांगळे कॉंग्रेसच्या पाठींब्याने अध्यक्षा झाल्या. शिवसेनेच्या पाठींब्याने कॉंग्रेसच्या नयना गावित उपाध्यक्षा झाल्या. या दोघींनीही नुकतेच शिक्षण
पूर्ण करुन संसारात रमण्याची स्वप्ने पाहिली होती. मात्र जिल्हा परिषदेचा कारभार हाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. 

या घडामोडींत राजकारणात रमलेले अनेक मुरब्बी नेत्यांचे डाव उलटे पडल्याने यासंदर्भात कार्यकर्ते, नेते मंडळी सगळेत "पुढे काय?' असे विचारत असतात. याबाबत त्या म्हणाल्या, "पावसाळा संपला की घरासाठी लांबवरुन डोक्‍यावर हंडा भरुन पाणी आणने हे खेड्या, पाड्यातल्या महिलांच्या पाचवीला पुजले आहे. नाशिकहा पाण्यासाठी
समृध्द जिल्हा आहे. असंख्य पाझर तलाव, लहान बंधारे, धरणे आहेत मात्र उन्हाळ्यात ते कोरडे पडतात."

"जलयुक्त शिवार पासून असतील नसतील त्या  सगळ्या  योजनांचा वापर करुन प्रत्येक गावाचा जलस्त्रोत बळकट करणे. या बंधाऱ्यांची पाणी पातळी वाढवणे हे काम हाती घेतले आहे. कॉंग्रेस, शिवसेना हे सगळे सत्तेत एकत्र आलेत. त्यांच्यात काय फरक आहे. त्यांची राजकीय विचारप्रणाली
काय मला माहित नाही. कळतही नाही. मात्र विकास अन्‌ गरीबांचे प्रश्‍नएव्हढच मला कळते. त्यात आम्ही सगले एकत्र आहोत. महिलेच्या डोक्‍यावरचा हंडा दूर करणे यात पक्ष, राजकारण अडवे येणार नाही याची खात्री आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com