आपल्या कामातूनच सकारात्मक ऊर्जा मिळते : सीमाताई हिरे 

..
Seema Hire.
Seema Hire.

नाशिकमध्ये आपल्या पक्षामध्ये केलेले काम, संघटन, वेगळं कौशल्य यामुळे भाजप आमदार सीमाताई हिरे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या वाचनामुळे त्या आमदारकीपर्यंत पोहचल्या आहेत. सकाळ माध्यम समूहाच्या 'महाराष्ट्र  दौऱ्यात' संदीप काळे यांनी प्रश्न-उत्तर स्वरूपात घेतलेली त्यांची  विशेष मुलाखत 

पुन्हा सत्ता येईल का? काय वाटते?
 

सत्तेत असताना सर्व वरिष्ठ नेते  निर्णय घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि इतर नेते योग्य ते निर्णय घेत असतात. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच येईल अशी आशा आहे. 

काम करण्याची ऊर्जा कशी मिळाली?

माझे वडील शिक्षक आहे. ज्यावेळी क्लासेसची परंपरा नव्हती त्यावेळी त्यांनी नाशिकमध्ये क्लासेस सुरु केले. सर्व विषय ते स्वतः:शिकवत होते. पहाटे ५ वाजल्यापासून सुरु होणारे क्लास रात्री १० वाजेपर्यँत सुरु असायचे. ७० व्या वर्ष त्यांनी पीएचडी केली. हे करत असताना त्यांनी काढवा कारखाना याविषयी खूप अभ्यास केला.  तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना तेथील अध्यक्ष केले.

त्यांना क्लासेस आणि कारखाना दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र येत असल्याने आईने पुढे जाऊन ही जबाबदारी सांभाळली. सासरी आल्यावर सासऱ्यांची मदत मिळाली. सासरे जवळपास १० वर्षे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस होते. २३ वर्षे त्यांनी खूप चांगलं काम केलं. या कामातून मला एक सकारात्मक ऊर्जा मिळत गेली. 

महिला म्हणून काम कसं सांभाळता?

महिला म्हणून काम करताना खरी कसरत असते. घर सांभाळून बाकी गोष्टी कराव्या लागतात. मात्र घरच्यांचा पाठींबा असेल तर आपण ही जबाबदारी सहज पेलू शकतो. आज मला दोन मुली, एक मुलगा आहे. संपूर्ण कुटुंब आहे. माझे पती आहेत, त्यांचा मला खूप पाठींबा आहे. 

विधानसभा निवडणुकांना घेऊन काय तयारी सुरु आहेत? 

२००२ सालापासून मी नगरसेविका म्हणून काम करत होते. ते काम करत असताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक नागरिक माझ्याकडे समस्या घेऊन आले. त्या सर्व समस्या मी सोडवल्या. हीच कार्यपद्धती घेऊन मी तीन टर्म चढत्या क्रमाने नाशिकमध्ये काम करत राहिले.

या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आमच्या वरिष्ठांनी मला उमेदवारी दिली. २०१४ मध्ये मोठ्या मताधिक्याने मी आमदार म्हणून निवडून आले. मी ज्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केले तो विभाग आणि मतदारसंघ हे वेगवेगळे आहेत. चार निवडणुकांमध्ये चार भागांतून मी काम केलं आहे.

त्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला. प्रत्येक काम करताना एक आव्हान होत. या मतदार संघात काम करताना ग्रामीण भागातील कामगारांची संख्या अधिक होती. त्यामुळे मतदारसंघात खूप मोठे प्रश्न होते. भाजपाचे मंत्रिमंडळ असल्याने मला निधी मिळवण्यास यश मिळाले. मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची कामे या विभागात पूर्ण झाली. 

तुम्हाला वाचनाची आवड आहे,कोणत्या पद्धतीचं वाचन तुम्ही करता?

मला वाचनाची खूप आवड आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध विषयांवर माझं वाचन सुरु असते. शिक्षकाच्या घरामध्ये असल्याने तो वारसा माझ्याकडे आला आहे. सध्या मला अपडेट राहता यावं यासाठी वर्तमानपत्रे रोजच्या रोज वाचते. त्यासोबतच सुधा  मूर्ती, विश्वास पाटील यांची पुस्तके मला वाचायला आवडतात. 

तुमच्या बोटात विविध रंगांच्या अंगठ्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
 

मी मुळात आध्यात्मिक कुटुंबातून आली आहे. राजकीय क्षेत्रात गेल्यानंतर "हा खडा घातला तर तुम्हाला यश मिळेल" किंवा "प्रगती होईल" आहे असे सांगणारे अनेकजण असतात. त्यानुसार या खड्यांच्या अंगठ्या मी घातल्या आहेत. 

पक्षामध्ये सातत्याने बदल होत असतात, त्यातून कसा मार्ग काढता?

अगदीच, निवडणुकींच्या पार्शवभूमीवर पक्षांत अनेक बदल होत असतात. अनेकजण पक्ष सोडून जातात, इतर पक्षातील अनेकजण पक्षात येतात. अशावेळी जे सुरुवातीपासून जे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात आहेत, त्यांच्या मनात आपल्याला डावललं जाते का? अशी भावना येत असते. मात्र भाजपातील वरिष्ठ नेत्यांना कोणाला कुठे स्थान द्यायचे आहे, हे माहीत आहे. त्यामुळे आजपर्यंत पक्षातील कोणावर अन्याय झाला असेल, असं मला वाटत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com