Nasik BJP does not follow C.M. Phadnavis"s commitment | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या आश्र्वासनाला `भाजप`चा हरताळ: नाशिकचा `सीसीटिव्ही`ला दिरंगाई 

संपत देवगिरे- सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

``भाजपच्या घोषणा फक्त निवडणूकीसाठी असतात. गेले सहा महिने पाठपुरावा करुनही शासन नाशिकच्या हिताच्या प्रस्तावर निर्णय घेत नाही.``- आमदार जयंत जाधव.

नाशिक, ता. 18 : सिंहस्थाच्या वेळी केलेली घोषणा, महापालिका निवडणूकीत शहर दत्तक घेऊन शहरात `सीसीटिव्ही` बसविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली आहे. याबाबत महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करतांना खुद्द भाजपनेच त्याला हरताळ फासला. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनाच टिकेचे धनी व्हावे लागले आहे.

स्मार्टसिटीच्या दृष्टीने आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी सीसीटीव्हीच्या प्रस्तावाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती. त्याबाबत भाजपच्या स्थानिक आमदारांनी गाजावाजा करीत त्याचे श्रेय घेण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. मात्र आता हे सर्व शासनस्तरावर बारगळल्याचे चिन्हे आहेत. 

सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये शहरात सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यात आल्याने यादरम्यान गुन्हेगारी घटनांना अटकाव बसतानाच काही गुन्हेही उघडकीस आले होते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिक शहरात सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार घोषणाही केली आहे. परंतु शासनस्तरावर सदरचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. 

कुंभमेळ्यामध्ये नाशिक शहरात सुमारे 700 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. 
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिकमध्ये एकदा नव्हे तर तीन वेळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भातील घोषणा केली. पोलीस आयुक्तांना तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही केल्या. तत्कालिन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन्‌ यांनी यासंदर्भात खासगी कंपनीकडून सर्वेक्षण करुन शासनाला सादर केला होता. मंत्री मंडळाच्या बैठकीत त्यात काही सुधारणा सुचविल्याने महिन्यांपूर्वी शहरात 302 ठिकाणी सुमारे 900 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव दिला. मात्र अद्यापही तो मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याने व महापालिका अंदाजपत्रकात त्याचा उल्लेखही नसल्याने मुख्यमंत्र्यांची घोषण हवेतच विरली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख