भाजप नगरसेवकांच्या बैठकीस दोन्ही आमदारांची दांडी 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आजच्या महासभेच्या विषयपत्रिकेत परिवहन सेवेचा प्रस्ताव समाविष्ट केला होता. त्याविषयी महापौरांसह कोणालाही विश्‍वासात घेतले नाही. नगरसेवकांची समिती स्थापन करण्यास नकार दिला होता. त्यामुळे नगरसेवक संतप्त होते. यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले होते. त्यामुळे नगरसेवकांच्या बैठकीत सभागृहनेते दिनकर पाटील तसेच अन्य नगरसेवकांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले होते.
Seema Hire-Devyani Pharande
Seema Hire-Devyani Pharande

नाशिक : महापालिकेतील कामकाजावरुन गेल्या काही बैठकांत भाजप आमदारांना सातत्याने नगरसेवकांच्या रोष व आरोपांना सामोरे जावे लागत आहे. शहर परिवहन सेवेसंदर्भात आज महापौर निवासस्थानी नगरसेवकांची बैठक झाली. मात्र यातुन नवा आरोप होऊ नये यासाठी सीमा हिरे आणि देवयानी फरांदे या दोन्ही आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. आमदारांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत परिवहन समिती स्थापन करूनच सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आजच्या महासभेच्या विषयपत्रिकेत परिवहन सेवेचा प्रस्ताव समाविष्ट केला होता. त्याविषयी महापौरांसह कोणालाही विश्‍वासात घेतले नाही. नगरसेवकांची समिती स्थापन करण्यास नकार दिला होता. त्यामुळे नगरसेवक संतप्त होते. यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले होते. त्यामुळे नगरसेवकांच्या बैठकीत सभागृहनेते दिनकर पाटील तसेच अन्य नगरसेवकांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले होते. आमदार सुपारी घेऊन बोलतात. नगरसेवकांना धमकावतात असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे आमदार व नगरसेवकांत एकेरीवर येऊन वाद झाला. 

त्याचे पडसाद पालकमंत्र्यांकडेही उमटले होते. या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी आज बैठक बोलावली होती. त्यात पक्षाच्या आमदार सीमा हिरे आणि आमदार फरांदे दोघींनीही गैरहजर राहणेच पसंत केले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थन व विरोध यातुन नगरसेवक व आमदारांत चांगलीच दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com