यतीन कदम यांचे डोके ठिकाणावर नाही

शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम आणि भाजपचे यतीन कदम यांच्यातील राजकीय भाऊबंदकी चांगलीच रंगली. दोघांनीही परस्परांवर आरोप केल्याने हा वाद चर्चेचा विषय बनला आहे.
Yatin kadam
Yatin kadamsarkarnama

ओझर : ओझर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत करण्यात आले. त्याची घोषणा झाली मात्र निवडणूक लांबल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम आणि भाजपचे यतीन कदम यांच्यातील राजकीय भाऊबंदकी चांगलीच रंगली. दोघांनीही परस्परांवर आरोप केल्याने हा वाद चर्चेचा विषय बनला आहे.

यासंदर्भात माजी आमदार अनिल कदम म्हणाले, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांचे संतुलन बिघडले आहे. ते काहीही दावे करतात. त्यांनी माहिती घेऊन बोलावे. यावर माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे यतीन कदम म्हणाले, नगर परिषदेची शासनाकडील फाईलच तात्रिक कारणाने अडकली आहे. यामुळे निर्माण झालेल्या जनतेच्या अडचणींना जबाबदार कोण?. इतके दिवस ते झोपले होते का? केवळ नागरिक आघाडी सत्तेवर येऊ नये हाच अनिल कदम यांचा डाव आहे.

ओझर नगरपरिषदे संदर्भात यतीन कदम यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांनी त्यांचे बंधू व राजकीय विरोधकांना चांगलेच खडसावले. ते म्हणाले, त्यांनी माझा एकेरी उल्लेख केला. मला तरी असे वाटते की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, मुस्लिमांची बदनामी केली म्हणजे आपल्याला हिंदुची मते मिळतील, असा त्यांचा डाव असल्याचा पलटवार माजी आमदार अनिल कदम यांनी केला आहे.

Yatin kadam
दिलीप बनकर म्हणाले, `पिंपळगाव टोल नाका बंद पाडू`

यतिन कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना असे वाटते की, मुस्लिम समाजाला नाव ठेवले तर आपल्याला हिंदुची मते मिळतील. त्यांच्या पक्षाचा हा राजकीय अजेंडा राहिला असेल. त्याविषयी मला काही देणेघेणे नाही. परंतु, मी कट्टर शिवसैनिक आहे. मला काय गमावयचे ते मी गमवून बसलो आहे. त्यामुळे माझे काम मी करत राहणार केवळ लोकशाही आहे म्हणून कुणीही उठावे आणि आरोप करत सुटावे, हे योग्य नाही. आपल्या बरोबरीची व्यक्ती असेल तर एकेरी उल्लेख केला असता तर ठिक होते. पण, त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळेच त्यांनी हा आरोप केला असेल.

अनिल कदम म्हणाले, कत्तलखाना चालकाकडून ५० हजार रुपये घ्यायला मी काय वेडा आहे का? माझ्यावर विश्वास बसत नसेल तर खलिल कुरेशी याच्याकडूनच माहिती घ्या. केवळ आरोप झाला म्हणून विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य माहिती घेवून खात्री करून घेण्याचे आवाहन करून सत्तासुंदरी मिळवण्याचा हा घाट आहे. याव्यतिरीक्त या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. यतिन कदम यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन येत्या दोन दिवसांत ऑनलाईन पध्दतीनेच करणार आहे. माझा घसा बसलेला असल्यामुळे आवाज व्यवस्थित निघत नाही. येत्या दोन दिवसांत सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असेही अनिल कदम म्हणाले.

दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे यतिन कदम यांनी माजी आमदार अनिल कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. ओझर नगरपरिषदेच्या निर्मितीवरून यतिन कदम यांनी प्रथमच माजी आमदार अनिल कदम यांच्यावर शरसंधान केले आहे. कतलखाना चालवणाऱ्या व्यक्तीकडून ५० हजार रुपये घेऊन नगरपरिषदेच्या १०० कर्मचाऱ्यांना किराणा किट वाटल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. आजपर्यंत एकदाही पाविषयी बोललो नव्हतो; परंतु आमच्यावर आरोप होत असल्याने येत्या निवडणुकीत पुराव्यानिशी जनतेसमोर जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे राजकारण आता चांगलेच तापल्याचे दिसून येते.

यतिन कदम यांनी नुकतीच ऑनलाईन पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप ओझर ही नगरपरिषद झाली असे एकदाही जाहीर केलेले नाही. त्यामुळे माजी आमदार अनिल कदम यांनाच घोषणा करण्याची घाई झाली होती. नगरपरिषद होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची अद्याप पुर्तता झालेली नाही. त्यामुळे केवळ आमच्या नागरिक आघाडीचा सरपंच येथे नये म्हणून त्यांनी ही घाई केली. त्याचे दुष्परिणाम आता जनतेला भोगावे लागत आहेत.

ते म्हणाले, ओझरच्या नागरिकांना दाखले मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यासाठी माजी आमदारांनी काय प्रयत्न केले? ते दाखवावे. आम्ही दोन वेळा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यांनी त्यावर निर्णय न घेतल्यास लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओझर नगरपरिषद झाली पाहिजे असे सर्वांना वाटते. पण, सर्व कागदपत्रांची पूर्तता न करताच प्रस्ताव पाठवण्याची धाई त्यांनी केली. आता तेच रोहन देशमुख याच्या नावाने रडत आहेत. हा रोहन देशमुख हा आहे तरी कोण?. आमदार, खासदार आहे की, मुख्यमंत्री. त्याने नगरपरिषदेच्या निर्णयाला स्थगिती मिळली आहे. त्याला 9 महिने झाले. राज्यात तुमचे सरकार असताना इतके दिवस काय झोपले होते का? तुम्हीच घोषणा करता अन् आता रडण्याचा कांगावाही तुम्हीच करता.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com