जळगाव महापालिकेत सत्तांतरानंतर पुन्हा वातावरण तापलं! - shivsena and bjp leaders are fighting each other in jalgaon municipal corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

जळगाव महापालिकेत सत्तांतरानंतर पुन्हा वातावरण तापलं!

कैलास शिंदे
मंगळवार, 4 मे 2021

जळगाव महापालिकेत भाजपकडे मोठे बहुमत असतानाही विरोधी पक्ष असलेल्या  शिवसेनेने नगरसेवक फोडून सत्ता मिळवली आहे.

जळगाव : जळगाव महापालिकेत भाजपकडे मोठे बहुमत असतानाही विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने नगरसेवक फोडून सत्ता मिळवली आहे. यानंतर मात्र भाजप आक्रमक झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. रोज उठून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करुन लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे. (shivsena and bjp leaders are fighting each other in jalgaon municipal corporation) 

शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 60 कोटीचा निधी महापालिकेस मंजूर करून दिला. या वेळी त्यांनी माजी पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वर टीका केली. महाजन यांनी जळगावची वाट लावली, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर जोरदार राजकीय घमासान सुरू झाले आहे. भाजपनेही पत्रकार परिषद घेऊन गुलाबराव पाटील यांच्यावर नाचता येईना अंगण वाकडे, असे म्हणत टीका केली. त्याला शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी भाजप तमासगीर, या शब्दात टोला लगावला आहे. 

हेही वाचा : बंगालच्या हिंसाचारावर नड्डा म्हणाले, फाळणीनंतर पहिल्यांदाच असं घडलं! 

शिवसेना महासभेत घेरणार
शिवसेनेने आता भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे घेरण्याची तयारी सुरू केली आहे. 12 मे रोजी महासभा होत आहे. यात घरकुल प्रकरणात दोषी असलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका व्यापारी संकुलातील गळ्यांचा प्रश्न निकाली काढून भाजपला शह देण्याची खेळी करण्यात येणार आहे. तसेच, शिवसेनेच्या नगरसेवकाच्या प्रभागात अधिक निधी विकासाला देऊन भाजपची कोंडी करण्यात येणार आहे. त्या मुळे आगामी काळात जळगावात शिवसेना व भाजप असा जोरदार संघर्ष होणार असल्याचे दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख