सत्ताधारी शिवसेना आमदारानेच ठोकलं महावितरणला टाळं!

कृषिपंपाच्या विजबिलाची शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महावितरणच्यामुख्य कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
shiv sena mla kishor patil protests against mahavitran
shiv sena mla kishor patil protests against mahavitran

जळगाव : कृषिपंपाच्या विजबिलाची (Electricity Bill) शेतकऱ्यांकडून  (Farmers) सक्तीने वसुली करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेनेचे (Shivsena) पाचोरा येथील आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी तालुक्यातील महावितरण (Mahavitaran) मुख्य कार्यालयास आज टाळा ठोको आंदोलन केले. यात आमदारांसह ४५ जणांना पोलिसांनी अटक केली. हे आंदोलन विरोधकांनी करायला पाहिजे  होते, परंतु विरोधकांच्याच धमक नाही म्हणून आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

पाचोरा तालुक्यातील गिरड रस्त्यावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयास आज सकाळी कुलूप लावण्यात आले. या वेळी बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले, आमची सत्ता असली तरी आम्ही जनतेचे सेवक आहोत. सत्तेशी आम्हाला देणंघेणं नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही कोणताही अन्याय सहन करणार नाही. हे आंदोलन विरोधकांनी करायला पाहिजे  होते, परंतु विरोधकांच्याच धमक नाही म्हणून आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे.

हेही वाचा : आंदोलन करण्यासाठी गाय आणून पोलीस ठाण्यातच बांधली! 

यानंतरही महावितरणने शेतकऱ्यांची वसुली सुरूच ठेवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात  शहर प्रमुख किशोर बारावकर, गणेश पाटील, चंद्रकांत धनवडे, संदीपराजे पाटील, जितेंद्र पेंढारकर, दत्तात्रय जडे, सुमित सावंत, नगरसेवक राम केसवानी, बापू  हटकर, रहमान तडवी, शीतल सोमवंशी, गजू पाटील, अनिल राजपूत, सुनील पाटील, प्रवीण ब्राम्हणे,  शरद पाटील,  वैभव राजपूत, विकास पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. आमदार किशोर पाटील यांच्यासह ४५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com