नेत्यांची वेळ चुकली..काँग्रेसच्या माजी खासदाराकडून घरचा आहेर 

सोनिया गांधी अध्यक्ष होत नसतील तर त्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करावे, असे मत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले आहे.
42ulhas_patil.jpg
42ulhas_patil.jpg

जळगाव : "गांधी घराण्याशिवाय अध्यक्षपदासाठी दुसरा कोणताही विचार होऊच शकत नाही. सोनिया गांधी अध्यक्ष होत नसतील तर त्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करावे. आजच्या स्थितीत त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपला टक्कर देता येईल," असे मत प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले आहे. याबाबत थेट सोनिया गांधीना मेलही पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पक्षात जोरदार वाद सुरू झाले आहेत. त्याबाबत कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते  म्हणाले, "कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय कोणाचाच विचार होवू शकत नाही.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जे विचार व्यक्त केले आहे. त्यांना प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठींबा आहे. सोनिया गांधी अध्यक्ष होवू शकत नसतील तर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे. आजच्या स्थितीत भारतीय जनता पक्षाला तेच खऱ्या अर्थाने टक्कर देवू शकतील. याबाबत आम्ही सोनिया गांधीना यांना मेलही केला असल्याचे त्यानी सांगितले.

 
नेत्यांची वेळ चुकली

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत वाद निर्माण करणाऱ्या पक्षाच्या नेत्याबाबत ते म्हणाले, "त्यांची ही वेळ चुकलेली आहे. त्यांनी चुकीच्या वेळेस हा वाद उपस्थित केला आहे. सोनिया गांधी सक्षमपणे पक्ष सांभाळत आहे. काही दिवसापूर्वीच त्या रूग्णालयातून उपचार घेवून परतल्या आहेत. अशा स्थितीत त्यांना पाठींबा व्यक्त करण्याऐवजी या नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर वाद निर्माण केला. सद्या तरी वादाची वेळ नाही.
 
तर भाजपला फायदा होईल

आजच्या स्थितीत भाजपाबाबत प्रचंड नाराजी असल्याचे मत व्यक्त करून डॉ. पाटील म्हणाले, कि जनता भाजपवर नाराज आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्य करावे. मात्र, पक्षात वाद झाले तर त्याचा फायदा भाजपला होईल. भाजपचे अंधभक्त व आय.टी.सेल आक्रमक आहेत. मात्र, राहूल गांधी हे ताकदीने त्यांना उत्तर देत असतात. त्यामुळे आजच्या स्थितीत पक्ष बळकट करण्यासाठी राहुल गांधी यांचेच नेतृत्व योग्य आहे. त्यांना सर्वानी पाठींबा दिला पाहिजे. 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com