दहा हजारांची नोकरी करणाऱ्या सरोज अहिरेंचे 'मिरॅकल' - ठरल्या जायंट किलर आमदार

राजकारण सामन्यांचे, शिक्षितांचे, युवकांचे काम नाही. एखाद्या राजकीय हितशत्रुला संपवायचे असेल तर निवडणुकीत उमेदवारी करायला सांगा. तुमचे काम फत्तेच समजा. अशा अनेक चर्चा नव्या नाहीत. सगळेच रोजच त्या अनुभवतात. मात्र लोकांचे प्रेम, आपुलकी, विचारावर नीष्ठा अन्‌ ध्येयासक्ती असेल तर ते घडते. अगदी आजही घडते त्याचे मुर्तीमंत उदाहरण, राजकारणातील 'मिरॅकल' म्हणजे, आमदार सरोज अहिरे. एका निवांत क्षणी त्यांनी आपली वाटचाल उलगडली. तो प्रवास खरोखर अविश्‍वसनीय म्हणावा असाच आहे.
 दहा हजारांची नोकरी करणाऱ्या सरोज अहिरेंचे 'मिरॅकल' - ठरल्या जायंट किलर आमदार
Political Journey of Nashik NCP MLA Saroj Ahire

"मी दहा हजार रुपये पगारावर आयुर्विमा महामंडळाकडे नोकरी करीत होते. नोकरी करायची अन्‌ कुटुंबाला मदत करायची एव्हढेच माझे ध्येय. मात्र, शरद पवार साहेबांनी मला राजकीय दिग्गजाविरोधात उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाली तेव्हा माझ्याकडे अवघे दीड लाख रुपये. जाणकार म्हणायचे एव्हढ्यात तर ग्रामपंचायतीचीही निवडणूक होत नाही. मात्र लोकांच्या प्रेमाचा, मतांचा वर्षाव झाला. मी आमदार झाले याचे आज मलाही आश्‍चर्य वाटते.....देवळाली मतदारसंघाच्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार कुमारी सरोज अहिरे आपला प्रवास सांगत होत्या.

राजकारण सामन्यांचे, शिक्षितांचे, युवकांचे काम नाही. एखाद्या राजकीय हितशत्रुला संपवायचे असेल तर निवडणुकीत उमेदवारी करायला सांगा. तुमचे काम फत्तेच समजा. अशा अनेक चर्चा नव्या नाहीत. सगळेच रोजच त्या अनुभवतात. मात्र लोकांचे प्रेम, आपुलकी, विचारावर नीष्ठा अन्‌ ध्येयासक्ती असेल तर ते घडते. अगदी आजही घडते त्याचे मुर्तीमंत उदाहरण, राजकारणातील 'मिरॅकल' म्हणजे, आमदार सरोज अहिरे. एका निवांत क्षणी त्यांनी आपली वाटचाल उलगडली. तो प्रवास खरोखर अविश्‍वसनीय म्हणावा असाच आहे.

त्या म्हणाल्या, ''माझे वडील (कै) बाबुलाल अहिरे समाजासाठी झटणारे साधे कार्यकर्ते होते. समाजासाठी काम करतांना स्वतःचा, अगदी कुटुंबाचाही विचार न करणारे. यातुन ते 1978 व 1980 मध्ये देवळालीचे आमदार झाले. त्याच कालावधीत त्यांचे निधन झाले. तेव्हा सात भावंडाचा कुटुंबाचा सर्व भार आईने उचलला. तोपर्यंत ती कधी घराबाहेरही पडली नव्हती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आम्ही जमेल तसे शिकलो, वाढलो. यात फीसाठी पैसे नसल्याने बारावीनंतर शिक्षण सोडून द्यावे लागले. हिशेब लिहिण्याची कामे केली. मी एचडीएफसी बॅंकेसह विविध संस्थात मिळेल ती कामे केली. आर्युविमा महामंडळाच्या कलेक्‍शन सेंटरमध्ये दहा हजाराची नोकरी केली. नोकरी करावी अन्‌ त्यातुन कुटुंब चालविण्यासाठी आईला मदत करणे एव्हढेच ध्येय बनले होते. आयुष्याची अशी वाटचाल करणारी तरुणी काय करु शकते?. काय स्वप्न पाहू शकते?. माझेही तसेच होते.''

त्या पुढे म्हणाल्या, ''सामाजिक कामाची मला आवड आहेच. 'नाम' फाऊंडेशनकडून शेतकऱ्यांना मदत जमा करण्याच्या कामातही सहभागी झाले होते. आर्युविमा पॉलीसीसाठी लोकांना भेटायचे. हे करतांना मी बाबुलाल अहिरे यांची कन्या आहे, हे समजल्यावर लोक खुप आस्थेने विचारपुस करायचे. यावेळी यावेळी काही लोक मला वडिलांच्या कामाविषयी सांगायचे. काही म्हणायचे तू राजकारणात गेले पोहिजे. पदावर गेले तर अधिक चांगले सामाजिक काम करता येते याची जाणीव पहिल्यांदा मला, सुरेश बोराडे काकांनी करुन दिली. पिंपळगाव खांब, वडनेर, विहितगावचे अनेक लोक सांगायचे. निवडणुकीत उमेदवारी करा असे ते सतत सांगत राहिले. त्यानंतर आम्ही कुुटंबात चर्चा केली. मात्र आर्थिक स्थिती पाहता आमचा नकारच होता. मात्र लोकांच्या आग्रहाखातर 2016 मध्ये मी महापालिकेला माजी महापौरांविरोधात उमेदवारी केली. तेव्हा लोकांच्या घरी गेले तर लोक वडिलांविषयीच्या आठवणी अगदी डोळ्यात अश्रुंसह सांगत. तेव्हाच मला वाटले की मी हमखास विजयी होणार. लोक म्हणायचे आता नगरसेविका करतोय. त्यानंतर आमदार करायचे आहे. हे सगळे माझ्यासाठी आश्‍चर्य, धक्का, अविश्‍वसनीय होते. त्यात मी माजी महापौरांचा पराभव करुन विजयी झाले.''

'विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्षभर आधी गावोगावचे लोक मला बोलवायचे याच्या आठवणी त्यांनी सांगीतल्या. आमदार अहिरे म्हणाल्या, ''मी देखील सबंध मतदारसंघात जायचे. कार्यकर्ते जमत गेले. अनेक पदाधिकारी मला मुंबईला घेऊन गेले. विविध नेत्यांने भेटले. शेवटच्या क्षणी मला शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली. माझ्या समोर तीस वर्षे सत्ता असलेले, माजी मंत्री, विद्यमान आमदार थोडक्‍यात राजकारणातील 'जायंट' होते. मात्र लोक मला प्रचाराला न्यायचे. विश्‍वास, पाठींबा अन्‌ पैसेही द्यायचे. लोकांच्या प्रेमाचे रुपांतर मतांच्या वर्षावात झाले. ऐंशी हजाराहून अधिक मते मिळून मी विजयी झाले. अवघ्या काही महिन्यांत हे घडले. एक सामान्य युवतीच्या आयुष्यात एव्हढे मोठा बदल, यशाचे शिखर प्राप्त होऊ शकते याचा मला स्वतःलाही विश्‍वास बसत नाही. वडीलांच्या जनसेवेची पुण्याई अन्‌ हितचिंतक, मतदारांचा परिसस्पर्श यानेच माझ्या आयुष्याचे सोने झाले.''

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in