राष्ट्रवादीच्या कामचुकार पदाधिकाऱ्यांना बाजूला करा! दादांसमोरच कार्यकर्ते आक्रमक

अजित पवार हे जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पक्ष कार्याचा आढावा आज मुंबईतील बैठकीत घेतला.
ncp lader ajit pawar takes review of ncp work in jalgaon
ncp lader ajit pawar takes review of ncp work in jalgaon

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात काही पदाधिकारी पक्षाची पदे घेऊन बसले आहेत, मात्र ते काम करीत नाहीत. अशा पदाधिकाऱ्यांना त्वरित हटवावे, अशी आक्रमक भूमिका जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर घेतली. यावर अजित पवारांनी सहमती दर्शवली आहे. 

अजित पवार हे जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पक्ष कार्याचा आढावा आज मुंबईतील बैठकीत घेतला. या बैठकीला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, प्रदेश  उपाध्यक्ष संजय पवार, संजय गरूड, आमदार अनिल भाईदास पाटील व पक्ष निरीक्षक अविनाश आदिक उपस्थित होते.

या वेळी पक्षाचा तालुकानिहाय अहवाल अविनाश आदिक यांनी अजित पवार यांना सादर केला. त्यावेळी पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यात आली. शासकीय समितीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच, काम करीत नसतील अशा पदाधिकाऱ्यांना हटवून त्याच्या जागी नवीन नेमणुका करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. याला अजित पवारांनीनी सहमती दर्शविली. 

जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी जिह्यातील पक्षाची खरी परिस्थिती मांडली. पक्ष बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील काही नेत्यांना एकत्रित बसवून चर्चा करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अजित पवारांनी याला होकार दर्शविला आहे. जिल्ह्यातील सिंचन तसेच इतर कामाची माहितीही त्यांनी घेतली. जळगाव जिल्ह्यातील अडचणींबाबत अहवाल तयार करून पंधरा दिवसाच्या आत आपल्याकडे द्यावा, असे पक्ष निरीक्षक अविनाश आदिक व जिल्हा अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांना अजित पवारांनी सांगितले. या बैठकीनंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com