राज्यात सत्तेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेनात महिला पदाधिकारी

देशातील इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व जिल्ह्यांत आंदोलन केले जात आहे. एका जिल्ह्यात मात्र, पदाधिकारीच नसल्याने आंदोलनच झाले नाही.
ncp cancelled agitation against fuel price hike in jalgaon district
ncp cancelled agitation against fuel price hike in jalgaon district

जळगाव : देशातील इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी प्रदेश महिला आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, जळगावात महिला आघाडीला पदाधिकारीच नसल्याने हे आंदोलन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीवर पदाधिकारी नसल्याने आंदोलन रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.  

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कमी असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. त्यानंतर तीन दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती. आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरू झाली आहे. 

याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर खाली चूल मांडो आंदोलन करण्यात येत आहे. जळगावात हे आंदोलन झालेच नाही. याबाबत माहिती घेतली असता, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर जळगाव शहर महिला अध्यक्षपदही रिक्त आहे. त्यामुळे जळगावात हे आंदोलन झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीला पदाधिकारी नसल्याने आंदोलन रद्द करण्याची नामुष्की आली आहे. संघटना बळकट करण्यासाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच जिल्ह्यात संवाद यात्रा केली होती. त्यावेळी त्यांनी तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम करून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. याशिवाय एकनाथ खडसे यांनी पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला बळकटी येईल, असे चित्र होते. मात्र आज महिला आघाडीच्या आंदोलनाचा फियास्को झाल्याने राष्ट्रवादी पक्ष भाजपचा कसा सामना करणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्ष असूनही पक्षाला पदाधिकारी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com