
Nashik Political News: शिंदे गटाकडून उध्दव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिले जात आहे. नाशिकमध्येही ठाकरे गटातीव अनेक जणांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर संजय राऊत मैदानात उतरले असताना त्यांनाही ठाकरे गटातील पडझड रोखण्यात अपयश आलं होतं. तर काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जवळीक वाढली असल्यांचं चित्रही पाहायला मिळालं आहे. याचदरम्यान, आता उध्दव ठाकरेंनी टायमिंग साधलं आहे. पण त्यांनी शिंदेगटाऐवजी मनसेला लक्ष्य केलं आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षातील डँमेज कंट्रोल करण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा यांसह विविध दौरे केले असीअमित ठाकरेंनी देखील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला आहे. पण आता तिथेच उध्दव ठाकरेंना मनसेला खिंडार पाडण्यात यश आलं आहे. मनसेचे शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
राज्यातील मुंबई, पुण्यासह नाशिक महापालिकेच्या निवडणुका पुढील काही दिवसांत होणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असतानाच सर्वच पक्षातील इन्कमिंग व आणि आऊटगोईंगला जोर आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्ते हे ठाकरे गटात प्रवेश केल्यानं मनसेसाठी हा मोठा धक्का आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यात माजी नगरसेवक भैय्या मणियार , योगेश भोर, इंद्रभान सांगळे, मदन ढेमसे, प्रशांत जाधव, सागर कोकणे,श्रेयस फडणवीस यांच्यासमवेत १०० प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के
काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यापूर्वी देखील एकदा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. एकीकडे शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देणं सुरू आहे. मात्र दुसरीकडे आता ठाकरे गटाकडून मनसेला मोठा धक्का देण्यात आला आहे. मनसेचे शेकडो कार्यकर्ते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर हा जाहीर प्रवेश होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.