नारायण राणे बेरोजगार; टीआरपीसाठी काहीही बोलतात : गुलाबराव पाटील 

राज्याचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, ते बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना आपले महत्व वाढविण्याची गरज आहे. स्वतःचा टी. आर. पी. वाढविण्यासाठी ते काहीही बोलत असतात, अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. मंत्री पाटील जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
Narayan Rane unemployed; Anything speaks for TRP : Gulabrao Patil
Narayan Rane unemployed; Anything speaks for TRP : Gulabrao Patil

जळगाव : राज्याचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, ते बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना आपले महत्व वाढविण्याची गरज आहे. स्वतःचा टी. आर. पी. वाढविण्यासाठी ते काहीही बोलत असतात, अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. मंत्री पाटील जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. 

जळगाव येथे कृषी विभागाच्या वतीने "रानभाजी' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन रविवारी (ता. 9 ऑगस्ट) गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, रानभाजी ही औषधीयुक्त असते. त्याचे महत्व ग्रामीण भागातील जनतेला माहीत आहे. मात्र, शहरी भागातील जनतेला त्याची माहिती नाही. त्याची माहिती शहरी भागातील जनतेलाही व्हावी यासाठी "रानभाजी' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे. 

नारायण राणे बेरोजगार 

कोकणातील नाणार प्रकल्पा संदर्भात नारायण राणे यांनी वक्तव्य करताना पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा आहे, असा आरोप केला होता. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नारायण राणे यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही. ते सद्यस्थितीत बेरोजगार आहेत. हेच नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणमध्ये कोणताही प्रकल्प कधीही नेला नाही. त्यामुळे त्यांना कशावरही बोलण्याचा अधिकार नाही. मात्र, सध्या ते केवळ बोलत असतात आणि बोलण्यातूनच आपले महत्व वाढवून घेत असतात. त्यामुळे असे वक्तव्य करून ते आपला टीआरपी वाढवून घेत असतात. त्यांच्या बोलण्याला आता कोणतेही महत्व नाही. 

महाराजांना मनातून काढू शकत नाही 

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबाबत बोलताना ते म्हणाले, की कर्नाटक सरकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू शकते. मात्र, जनतेच्या मनातून काढू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिल्लीत जावून तेथील राज्यकर्त्यांना झुकविले आहे, तर कर्नाटक सरकार काय विशेष आहे. 

हेही वाचा : करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर 

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग (बारामती) येथे जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे सोलापूर जिल्ह्यात विशेषतः करमाळा तालुक्‍यात राजकीय चर्चा रंगली आहे. माजी आमदार जगताप यांनी नेमकी ही भेट कशासाठी घेतली? जगताप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत काय? याविषयी तर्क वितर्कांना उधाण आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ म्हणून ओळख असणारे माजी आमदार (कै.) नामदेवराव जगताप यांचे जयवंतराव हे चिरंजीव आहेत. जयवंतराव जगताप हे 1990 मध्ये प्रथम अपक्ष आमदार झाले. त्यानंतर ते 1995, 1999 मध्ये कॉंग्रेसकडून लढले. सन 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक होते. पण, 1999 मध्ये जगताप यांच्याऐवजी नारायणआबा पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. कॉंग्रेसकडून दोन वेळा लढूनही पराभव पदरी आल्याने ते 2004 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढले आणि निवडून आले. त्या वेळी त्यांनी माजी राज्यमंत्री (कै.) दिगंबरराव बागल यांचा पराभव केला होता. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com