दिंडोरी मतदारसंघात 'माकप'च्या गावितांच्या मदतीला 'मनसे' अन्‌ छावा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावित यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. कॉंग्रेस आघाडीकडून त्यांचा मुखभंग झाला. त्यामुळे विविध स्थानिक घटकांशी समन्वय सधान्यात ते व्यस्त आहेत. यासंदर्भात 'मनसे'चे माजी आमदार नितीन भोसले यांनी गावित यांना पाठींबा दिला आहे. ते गावितांच्या प्रचारात सक्रीय आहेत. मराठा छावा संघटनेने देखील जे. पी. गावित यांना पाठींबा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे गावित यांच्या मतांत किती वाढ होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दिंडोरी मतदारसंघात 'माकप'च्या गावितांच्या मदतीला 'मनसे' अन्‌ छावा

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावित यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. कॉंग्रेस आघाडीकडून त्यांचा मुखभंग झाला. त्यामुळे विविध स्थानिक घटकांशी समन्वय सधान्यात ते व्यस्त आहेत. यासंदर्भात 'मनसे'चे माजी आमदार नितीन भोसले यांनी गावित यांना पाठींबा दिला आहे. ते गावितांच्या प्रचारात सक्रीय आहेत. मराठा छावा संघटनेने देखील जे. पी. गावित यांना पाठींबा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे गावित यांच्या मतांत किती वाढ होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठा छावा संघटनेचे करण गायकर यांनी स्वतः नाशिक मतदारसंघात उमेदवारीची घोषणा केली आहे. श्री. गावित यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पाठींबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे गेले चार वर्षे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी पश्‍चिमवाहिनी नद्यांच्या माध्यमातुन गुजरातला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एकत्रीत पाठपुरावा करणारे "मनसे'चे माजी आमदार नितीन भोसले यांनीही गावित यांचा प्रचार करणार असल्याचे जाहिर केले आहे.

त्यामुळे कळवण- सुरगाणा मतदारसंघात प्राबल्य असलेल्या "माकप'ला अन्य भागातही प्रचाराच्या निमित्ताने विस्ताराची संधी आहे. 2014 च्या निवडणुकीत माकपचे हेमंत वाघेरे यांना 72,599 मते मिळाली होते. विधानसभा निवडणुकीत जे. पी. गावीत यांनाही सुमारे लाखभर मते मिळाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांचा मुंबई लॉंग मार्च, गुजरातच्या पाण्याचा संघर्ष आदी आंदोलनांमुळे गावित चर्चेत राहिले. त्यामुळे अन्य सहकाऱ्यांच्या मदतीचा मते वाढविण्यात त्यांना किती यश येते याकडे लक्ष लागले आहे.

वणी (कृष्णगाव) येथे रविवारी बैठक झाली. बैठकीस मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, राज्य कमिटीचे मेंबर किसन गुजर, जिल्हा सचिव सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, इरफान शेख, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार आदी पादधिकाऱ्यांसह दोन हजार कार्यकर्ते उपस्थित होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनराज महाले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर माकपच्या दिल्लीत जाहीर झालेल्या यादीत आमदार गावित यांना उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीनेही या मतदारसंघात बापू बर्डे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपत प्रवेश करणाऱ्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या तरी चौरंगी लढत रंगणार असल्याचे दिसत असून भाजपचे विद्यमान खासदार हरीश्‍चंद्र चव्हाण यांना उमेदवारी न मिळाल्याने ते काय भूमिका घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपविरोधी असलेल्या मतांची राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप व वंचित बहुजन विकास आघाडी या तिघांत विभागणी होणार असल्याने याचा फायदा व फटका कोणास बसतो, हा येणारा काळच ठरवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com