आमदाराचे नाव सांगून खंडणी मागण्याच्या प्रकाराने दस्तखुद्द आमदारही वैतागले.... - MLAs themselves got annoyed by the way of demanding ransom by mentioning His name | Politics Marathi News - Sarkarnama

आमदाराचे नाव सांगून खंडणी मागण्याच्या प्रकाराने दस्तखुद्द आमदारही वैतागले....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

पोलिस अशा खंडणीखोरांवर कधी कारवाई करणार....

घोटी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नावाने शासकीय आधिकाऱ्यांना धमकाविणाऱ्यामुळे दस्तुरखुद्द आमदार खोसकर त्रस्त झाले असून त्यांनी अशा खंडणी मागितल्यास, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

स्वयंभू आदिवासी नेत्यांकडून आमदारांच्या नावाखाली शासकीय अधिकारी व नागरिकांना वेठीस धरण्यात येत असल्याबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे. आमदार खोसकर यांनी कथित नेत्याविषयी स्वताच खुलासा केला आहे.

शासकीय कार्यालयात दमबाजी करणे, आदिवासी समाजाची फसवणूक व पिळवणूक करणे,आमदारांच्या नावाने धमकावणे आणि विविध कार्यालयातून अधिका-यांनी वसुली न दिल्यास त्यांच्या विरोधात तक्रारीत काही दिवसांपासून वाढ झाली आहे. स्वयंभू नेत्यावर घोटी पोलीस ठाण्यात एका आदिवासी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी व संगनमताने जमिनीची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सबंधित नेत्याला आदिवासी संघटनेकडून बेदखल केले होते. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यास अथवा नागरिकास धमकी अथवा खंडणी मागितल्यास थेट स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन खोसकर यांनी केेले आहे.

ही पण बातमी वाचा : नाशिक भाजपमध्ये लवकरच स्फोट!

नाशिक : नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत अन्य पक्षातून येउन भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्याची भाषा करू लागले आहेत. संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या मातब्बर नगरसेवकांवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षापासून दुरावलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी सुरु केली आहे.

भाजपने २०१७ च्या महापालका निवडणूकीत अन्य पक्षांतील निवडून येण्याची क्षमता असलेल्या नगरसेवकांना भाजपच्या तिकीटावर निवडून आणित प्रथमच मनपाची एकहाती सत्ता मिळविली. पण गेल्या चार वर्षात पक्षांतर्गत चढाओढीमुळे भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकचा भ्रमनिरास झाला. अनेकांची मने सत्ताकारणातून दुभंगली. त्यात राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आल्याने भाजप मध्ये गेलेल्या नगरसेवकांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा असलेले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या भक्कम गडाला तडे जाण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रात, नाशिक मध्ये सत्ता अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे निर्माण झाले आहे. त्यासाठी पर्क्षातंगत डागड्डुजी करतांना पूर्वाश्रमीच्या अन्य पक्षांमधील नगरसेवकांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष गट कार्यरत करण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख