जळगाव जिल्हयातील शिवसेनेचे हे आमदारही पॉझिटिव्ह

आमदार किशोर पाटील हे गेल्या दोन दिवसापूर्वी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भातील आढावा व पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे गेले होते.
2kishor_appa_patil_mla_pacho.jpg
2kishor_appa_patil_mla_pacho.jpg

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगावच्या भाजपा आमदारानंतर आता पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचाही कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते घरीच क्वारटाईन झाले आहेत. आमदार किशोर पाटील हे गेल्या दोन दिवसापूर्वी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भातील आढावा व पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे गेले होते.

शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ते मुंबईहून परत आले  त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यांची कन्या अभिनेत्री डॉ. प्रियंका पाटील हिने त्यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासंदर्भात आग्रह केल्याने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार किशोर पाटील यांना खोकल्या व्यतिरिक्त इतर कोणताही त्रास नाही. गेल्या आठवड्यात त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना व शिवालय कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिला होता. ते स्वतः क्वांरटाइन झाले होते. परंतु कामानिमित्ताने मुंबई येथे जाणे आवश्यक असल्याने ते मुंबई येथे गेले होते.

याबाबत आमदार किशोर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, कि आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाइन आहोत. या ठिकाणीच आपण उपचार घेत आहोत. आपल्या संपर्कात जे कोणी संपर्कात आलेले असतील त्यांना काही त्रास जाणवल्यास त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. जळगाव जिल्हयातील कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असलेले हे दुसरे आमदार आहेत. चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचाही तपासणी अहवाल आजच पॉझीटीव्ह आला असून तेही आपल्या घरीच क्वांरटाइन आहेत.

चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण युवा आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत ते चाळीसगाव मतदार संघातून विजयी झाले आहेत. मतदार संघात सामाजिक कार्य करण्यात त्यांचा मोठा धडका आहे. कोरोना काळातही त्यांनी मतदार संघात कार्य सुरूच ठेवले आहेत. परंप्रातीय मंजुरांना जेवण देणे, त्यांना स्वत:च्या वाहनातून त्यांना सीमेपर्यंत पोहोचविले. तसेच त्यांनी मजुरांच्या जेवणाची सुविधाही मोठ्या प्रमाणात केली होती. तसेच चाळीसगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला त्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. त्या ठिकाणी रूग्णांच्या सुविधाकडेही त्यांनी लक्ष दिले आहे. त्यांचा उद्या (ता.२३) वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यातर्फे त्याची तयारीही करण्यात येत होती.

आमदार चव्हाण यांना आजाराची लक्षणे दिसली त्यांनी आपली कोरोना तपासणी करून घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांचया सल्ल्यानुसार ते आपल्या घरीच क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी सोशल मिडीयावर म्हटले आहे, कि कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने मी चाचणी केली असता. माझा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्बेत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत;ला सेल्फ क्वारटाइन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत;ची चाचणी करावी व आपल्या सर्वांची काळजी घ्यावी हि विनंती ! आपल्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या सोबत आहेत. काळजीचे कारण नाही. आमदार मंगेश चव्हाण यांचा उद्या (ता. २३) रोजी वाढदिवस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com