सातारा सैनिक शाळेच्या तेजसने पूर्ण केले आजोबांचे लाल दिव्याचे स्वप्न 

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या निकालात सौंदाने (ता. मालेगाव) येथील तेजसने 576 वे स्थान प्राप्त केले. त्यासाठी त्यांने केलेले अवघड प्रवास युवकांना प्रेरणादायी तर त्याच्या कुटुंबीयांसाठी स्वप्नवत ठरला आहे.
सातारा सैनिक शाळेच्या तेजसने पूर्ण केले आजोबांचे लाल दिव्याचे स्वप्न 

नाशिक : आजोबांचे बारा भावंडाचे खटले. साठ एकरांची शेती, राजकारण, व्यापारात ऊठ बस. गावात मानमरातब. मात्र, घरापुढे लाल दिव्याची सरकारी गाडी उभी रहावी हे त्यांचे स्वप्न. मुलांना जमले नाही. सातारा सैनिक शाळेत शिकलेल्या तेजस पवारने मात्र 'एनडीए'मध्ये निवड झाल्यावरही ती संधी सोडुन युपीएससी परिक्षेत यशस्वी होऊन आजोबांचे स्वप्न पुर्ण केले आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या निकालात सौंदाने (ता. मालेगाव) येथील तेजसने 576 वे स्थान प्राप्त केले. त्यासाठी त्यांने केलेले अवघड प्रवास युवकांना प्रेरणादायी तर त्याच्या कुटुंबीयांसाठी स्वप्नवत ठरला आहे. तेजसचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण सौंदाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. उमराणे येथील शाळेत पाचवी उत्तीर्ण झाल्यावर तो सातारा सौनिकी शाळेत दाखल झाला. त्याला लष्करात काम करण्याची इच्छी तेथेच तयार झाली. त्याप्रमाणे सातारा सैनिकी शाळेत शिकता शिकता त्याने 'एनडीए'ची परिक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला. मात्र, त्याने ती संधी सोडली. कारणही तसेच होते. 

तेजसचे आजोबा बंडू नानाजी पवार यांची राजकारण्यांत ऊठबस. साठ एकर शेत जमीन. पेट्रोल पंप. मुलगा सरपंच. त्यामुळे गावात मोठा मान मरातब होता. त्यांची इच्छा होती. घरापुढे लाल दिव्याची गाडी असावी. त्याची सर्व मुले शिकली. त्यात सहा शिक्षक, बारा जण वैद्यकीय क्षेत्रात. तेजसची आई मीना, वडील नंदलाल दोघेही तीसगाव (देवळा) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. आईच्या संस्कारातुनच तेजसला शिक्षण नव्हे तर परिपूर्ण शिक्षणाची सवय जडली. त्यातुनच अथक परिश्रमातुन त्याने एनडीए परिक्षेत यश संपादन केले होते. मात्र त्याला आजोबांच्या स्वप्नाची आठवण झाली. त्याने ती संधी सोडली. अभियंत्रीकी पदवी घेतल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत नशीब काढण्याचा विचार केला. प्रारंभी पुण्यात व नंतर दिल्लीला सराव परिक्षेची तयारी केली. सुरवातीला दोनदा अपयश आले. मात्र तो निराश झाला नाही अन् तिस-यांदा यशस्वी झाला. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तो 576 व्या स्थानी आला अऩ् आजोबाचे स्वप्न नातवाने पुर्ण केले. 

परिक्षेत यशस्वी झालो. त्यापेक्षा आजोबांचे स्वप्न पुर्ण केल्याचा अधिक आनंद आहे. या ध्येयासाठी जिद्द व सातत्य असावे. ज्या क्षेत्रात जाऊ त्यात अद्ययावत ज्ञान असले की यश हमखास मिळते.
- तेजस पवार.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in