रथयात्रेत खडसेंचा सहभाग; फडणवीसांचा पुरावा कुठाय? 

अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यानिमित्त कारसेवा आणि लालकष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आठवणींना उजाळाही मिळाला. पण, या रथयात्रेवरून जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत पुराव्यांचा राजकीय धुराळा उडाला आहे.
Khadse's participation in the Rathyatra; Where is the proof of Fadnavis?
Khadse's participation in the Rathyatra; Where is the proof of Fadnavis?

जळगाव : अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यानिमित्त कारसेवा आणि लालकष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आठवणींना उजाळाही मिळाला. पण, या रथयात्रेवरून जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत पुराव्यांचा राजकीय धुराळा उडाला आहे. त्यात आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीवरून त्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. 

अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी भूमिपूजनानिमित्ताने जिल्ह्यात अनेकांनी आठवणी सांगितल्या, त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी आपण जळगाव जिल्ह्यात पाळधी येथे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे स्वागत केले. आपलाही या रथयात्रेत सहभाग असल्याचे सांगितले. 

भाजपचे माजी नगरसेवक उदय भालेराव यांनी त्यावर प्रश्‍न उपस्थित करीत लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा जळगावात आलीच नव्हती. तसेच, त्यांनी अडवाणी केव्हा केव्हा जळगाव जिल्ह्यात आले ते सांगून पाळधी येथे रथयात्रेत अडवाणी आलेच नव्हते, अशी माहिती सोशल मीडियावर अपलोड केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील "ठोकून देतात' असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले.

शिवसेनेचे जळगावचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी थेट पाळधी येथे लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा आल्याचे फोटोसह पुरावेच दिले. तसेच, पाळधी येथील भाजप कार्यकर्ते सुनील झवर यांची या यात्रेसाठी गुलाबराव पाटील यांची मदत झाल्याची व्हीडीओ क्‍लीपही प्रसिद्ध केली. 

आता या रथयात्रेवरूनही चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध झालेल्या फोटोत अडवाणी यांच्या रथयात्रेवर "सुराज्य रथयात्रा' असे नाव आहे. यात्रेवर व्यंकय्या नायडू, भाजपचे नेते एकनाथ खडसे, माजी आमदार बी. एस. पाटील दिसत आहे. ही रथयात्रा जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथून गेल्याचे पुरावेही भाजपचे कार्यकर्ते सुनील झवर यांनी दिले आहेत. मात्र, याबाबत माहिती घेतली असताता भाजपचे नेते व "बेटी बचाव बेटी पढाव' चे संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले की, ही रथयात्रा राम मंदिरासाठी काढलेली नव्हती, तर अडवाणी यांनी त्यानंतर काढलेली "सुराज्य रथयात्रा' असल्याचे सांगितले. 

रथयात्रेच्या पुराव्याचा धुराळा एवढ्यावरच थांबला नाही, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट खडसे आणि फडणवीसांच्या सहभागाच्या पुराव्यापर्यंत वाद सुरू केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कानाजवळून गोळी गेली, असे एका मुलाखतीत सांगितले. त्यावरूनही वाद उठला आहे. 

सोशल मीडियावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे, की या आंदोलनात सहभाग असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा एकही पुरावा कुठेही आढळून आलेला नाही. मात्र, सत्तेचा लाभ घेण्यात ते सर्वात पुढे ...भाजपने ज्या नाथभाऊंना डावलले त्यांचे राम मंदिराच्या सहभागात अनेक फोटो पहावयास मिळतात. याला म्हणतात "वशिला..' भाजप-शिवसेनेतील या वादाने सोशल मीडियावर सध्या तरी धुरळा उडविला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com