मी निरव मोदीसारखा पळून गेलो नव्हतो : छगन भुजबळ

"जेव्हाबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळ यांचीचौकशी सुरु होती तेव्हा अमेरिकेत मी अमेरिकेत होतो, चौकशीला सहकार्यच केले. निरव मोदीसारखा पळून गेलो नाही," असे प्रतिपादन माजी उपमुख्य मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.
मी निरव मोदीसारखा पळून गेलो नव्हतो : छगन भुजबळ

नांदगाव : "जेव्हा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळ यांची चौकशी सुरु होती तेव्हा अमेरिकेत मी अमेरिकेत होतो, चौकशीला सहकार्यच केले. निरव मोदीसारखा पळून गेलो नाही," असे प्रतिपादन माजी उपमुख्य मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले. 

भुजबळ कुटुंबियांनी आज शनिदेवाच्या मंदिरातल्या गाभाऱ्यात असलेल्या शनीच्या वालुकामय पुरातन मूर्तीवर पुरोहितांच्या मंत्रोच्चाराच्या जयघोषात महा अभिषेक केला. श्री क्षेत्र नस्तनपूर येथील देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांनी आयोजित केलेल्या भुजबळ कुटुंबियांच्या स्वागत प्रित्यर् कार्यक्रमात माजी भुजबळ बोलत होते.

राज्याचे पर्यटनमंत्री असतं जिल्ह्यातील बहुतांशी धार्मिक तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी नियोजन केले त्यामुळे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांना चांगल्या सुविधा मिळून लागल्याने पर्यटन वाढलेले आहे, असे सांगताना आपल्यावर येणाऱ्या संकटात परमेश्वर धावून येत असल्याने या संकटाशी मुकाबला करीत मिळालेले आयुष्य बोनस समजून समाजाच्या हितासाठी आपण मार्गी लावणार असल्याचे भावनिक उद्गारही भुजबळ यांनी काढले. 

माजी आमदार अनिल आहेर यांनी प्रास्ताविकात भुजबळ यांच्यावरील अटकेच्या कारवाईमुळे विकास थांबला होता व जिल्हाही पोरका झाला होता. आता भुजबळ यांची मुक्तता झाल्याने विकासाचे उर्वरित काम पूर्ण होण्यास मदत हणार असल्याचे नमूद केले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार,माजी आमदार जयवंत जाधव, साहेबराव पाटील, दिलीप इनामदार ,जिल्हा परिषदेच्या सदस्या आश्विनी आहेर, संतोष गुप्ता, रमेश पगार, समाधान पाटील, उदय पवार खासेराव सुर्वे आदी उपस्थित होते. 

दरम्यान येवल्याहून भुजबळ यांचे अडीच तास उशिरा आगमन झाले. मात्र  नियोजित वेळेपेक्षा तब्ब्ल अडीच तास उशिरा येऊनही मल्हारवाडी गंगाधरी जळगाव खुर्द आदी ठिकाणी रस्त्याच्या दुर्तफा उभ्या असलेल्या जनतेने ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात भुजबळ कुटुंबियांचे स्वागत केलेउघड्या कारमधून अभिवादन करणाऱ्या भुजबळ यांच्या हातात हात घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडालेली होती. देवस्थानस्थळी आगमन झालेल्या भुजबळ कुटुंबियांचे स्वागत टाळ-मृदंग घेतलेल्या वारकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने करीत त्यांना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहचविले. या ठिकाणी महाभिषेक संपन्न झाल्यावर छोटेखानी स्वागत सोहळा संपन्न झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com