Mahaprabodhan Yatra : पाचशे पोलिसांनी मला घेरले; मी दहशतवादी आहे का?

Mahaprabodhan Yatra : मुक्ताईनगरला जाण्यासाठी अंधारे बराचवेळ थांबून राहिल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना सभा घेण्यास परवानगी नाकारली.
Gulabrao Patil-Sushma Andhare
Gulabrao Patil-Sushma Andharesarkarnama

Mahaprabodhan Yatra : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार असून पाचशे पोलिसांनी मला अडवून धरले आहे. मी दहशतवादी आहे का ? असा प्रश्‍न करून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आज ललकारले. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करत मुक्ताईनगरला मंत्री गुलाबराव पाटील व अंधारे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मुक्ताईनगरला जाण्यासाठी अंधारे बराचवेळ थांबून राहिल्या मात्र, पोलिसांनी त्यांना सभा घेण्यास परवानगी नाकारली. रात्री उशिरापर्यंत त्या सभेला परवानगी मिळावी यासाठी आग्रही होत्या. या ठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. सभा घेण्याचा व मत मांडण्याचा आधिकार आहे. तो हिरावून घेतला जात आहे.पोलिसांच्या आडून राज्य सरकार सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्णन करीत आहे, असा आरोप अंधारे यांनी केला.

Gulabrao Patil-Sushma Andhare
म्हणालो होतो, 'मी पुन्हा येईन' अन् सिंचन योजनाही माझीच वाट पाहत बसली : फडणवीसांचा पुनरुच्चार!

शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सभा आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरला आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याच जागेवर पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना सभेसाठी परवानगी नाकारल्याने अंधारे यांना सभा घेता आली नाही. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना हाताशी धरून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अशा दबावाच्या राजकारणाला आपण भीक घालणार नाही, असे अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटले आहे.

Gulabrao Patil-Sushma Andhare
कोळींना जिल्हाबंदी; अंधारेंनाही परवानगी नाकारली : पाटील म्हणतात मी पालकमंत्री असल्याने...

राज्यातील सरकारच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात विशेषत: जे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. अशा आमदारांच्या मतदारसंघात वातावरण तापविण्यात येत आहे. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच सभांना अडसर निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात येत आहे. यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यातील सरकार घाबरल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in