धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चुडामण पाटलांचे पुण्यात कोरोनाने निधन

अनेकांसाठी हा धक्का ठरला..
dr-chudaman-patil
dr-chudaman-patil

धुळे ः कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने पुण्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल धुळ्यातील  हृदयरोग तज्ज्ञ, फिजिशियन डॉ. चुडामण पाटील (वय ५०) यांचे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास निधन झाले. ते खानदेशात मितभाषी, नम्र डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून शोक प्रकट झाला.

धुळे शहरातील पंचायत समितीसमोर डॉ. पाटील यांचे रुग्णालय आहे. ते पुण्यात उपचारासाठी दाखल होईपर्यंत रुग्णसेवा करत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे पुणे येथे म्हात्रे पुल परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना किडनी, ह्रदयासंबंधी व्याधी होती. त्यामुळे त्यांनी पुण्यात उपचाराचा निर्णय घेतला होता. नंतर प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. रक्तदाब कमी होत गेला. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते ठणठणीत व्हावे म्हणून वैद्यकीय क्षेत्रासह रुग्णांच्या पातळीवर प्रार्थना केली जात होती. मात्र, मंगळवारी सायंकाळी सातनंतर डॉ. पाटील यांचा कोरोनाने बळी घेतल्याची वार्ता वेगाने पसरली आणि वैद्यकीय क्षेत्रासह जिल्ह्यात शोककळा पसरली

.
या घटनेवर कुणाचाही विश्‍वास बसत नव्हता. त्यामुळे खातरजमा करण्यासाठी प्रसारमाध्यमे, डॉ. पाटील यांच्या मित्रपरिवाराकडे दूरध्वनी खणखणत होते. डॉ. पाटील चांगले क्रिकेटपटू होते. घरी कमी आणि सेवेसाठी रुग्णालयात अधिक, अशीही त्यांची ओळख होती. रुग्ण समाधानी व्हावा यावर त्यांचा भर होता. डॉ. पाटील यांच्या मागे पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. डॉ. पाटील यांना विविध मान्यवरांसह आयएमए, डॉक्टरांनी श्रध्दांजली वाहिली. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com