जळगावात एकनाथ खडसे भाजपला पुन्हा धक्का देणार - Eknath Khadse said that eight more BJP corporators will split | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

जळगावात एकनाथ खडसे भाजपला पुन्हा धक्का देणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

भाजपचे 27 नगरसेवक फोडत शिवसेनेने महापौर पद मिळवलं.

जळगाव : जळगाव महापालिकेतील सत्ता खेचून आणत शिवसेनेने भाजपला जोरदार झटका दिला. सांगलीनंतर जळगावमध्ये भाजपची सत्ता गेली. भाजपचे 27 नगरसेवक फोडत शिवसेनेने महापौर पद मिळवलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपला धक्का देण्याची शक्यता आहे. (Eknath Khadse said that eight more BJP corporators will split)

भारतीय जनता पक्षाचे आणखी आठ नगरसेवक नाराज असून ते आपल्या संपर्कात आहेत, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. आधी 27 नगरसेवक फुटले त्या गटासोबत हे आठ नगरसेवक फुटून जाणार आहेत. त्याबाबत त्यांनी आपल्याशी फोनवरून संपर्क साधल्याचेही खडसे यांनी सांगितले. त्यामुळे भाजपचे नेते गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा धक्का बसणार आहे. भाजपने 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 75 पैकी 57 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती.

हेही वाचा : तेवीस गावांच्या समावेशानंतर कशी असेल पुणे शहराची हद्द; जाणून घ्या...

गिरीश महाजनांची कर्जमुक्तीची घोषणा फसवी

जळगाव महापालिका सत्ता असताना आम्ही कर्जमुक्त केली, अशी घोषणा महाजन यांनी केली होती. मात्र, आज प्रत्यक्षात महापालिकेवर 125 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे महाजनांनी जळगावकरांची फसवणूक केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. महापालिकेचे महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर खडसे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. 

खडसे म्हणाले, जळगाव महापालिकेवर 300 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यापैकी 250 कोटी रुपयांचे कर्ज आम्ही फेडले. जळगाव महापालिका कर्जमुक्त केली, अशी घोषणा महाजन यांनी केली होती. मात्र, आज महापालिकेवर १२५ कोटी रुपयांचे कर्ज असून त्याअंतर्गत दरमहा तीन कोटी रुपये महापालिका शासनाला भरत आहे,  असे महापौर महाजन यांनी सांगितले. त्यामुळे महाजन यांची कर्जमुक्तीची घोषणा फसवी आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख