निधीबाबत काँग्रेसच्या आमदारांची अशोक चव्हाणांकडे तक्रार..

आमदारांना निधी वाटपात अन्याय होत असल्याबाबतची तक्रार काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे.
Shirish Chaidhary.jpg
Shirish Chaidhary.jpg

जळगाव : आपले सरकार असल्यामुळे त्याबाबत जाहीर वाच्यता करू नये, ही आपली कामाची पध्दत आहे. निधी असमानता असल्याबाबतचे लेखी पत्र आपण अगोदरच पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांना दिले आहे, अशी माहिती कॉग्रेसेचे रावेर (जि. जळगाव) मतदार संघातील आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी ‘सरकारनामा’शी बोलतांना दिली.

आमदारांना निधी वाटपात अन्याय होत असल्याबाबतची तक्रार काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. याबाबत रावेर (जि.जळगाव) मतदार संघातील काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, निधी वाटपाबाबत सर्वच आमदारांसाठी समानता असली पाहिजे. ती नसल्यामुळेच कॉंग्रेसचे आमदार आपली भूमिका व्यक्त करीत आहे. त्यात एवढेच आहे कि, आपले सरकार असल्यामुळे कुणी जाहीरपणे बोलत आहे. तर कुणी नेत्यांना लेखी लिहून कळवित आहे. 

ज्याच्या त्याच्या कामाची पध्दत असते. निधी वाटपात असमानता असल्याबाबत कॉंग्रेसच्या इतर आमदाराप्रमाणे आपलेही मत आहेत. परंतु आपल्या पध्दतीनुसार आपण लेखी लिहून महाविकास आघाडीतील समन्वय समितीचे पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांना कळविले आहे. सत्ताधारी पक्षातील सर्व पक्षातील आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, अशी आपण मागणी केली आहे.

 
पक्षाच्या नेत्यांनी न्याय द्यावा
विकास कामाच्या निधीत असमानता असल्यचे आपल्याला दिसून आले. त्याच वेळी आपण लेखी पत्र लिहले आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांना मतदार संघात काम करण्यासाठी निधी समान मिळला पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. आमच्यावर अन्याय होत आहे, हे निश्‍चित आहेत. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत असलेल्या काँग्रसेच्या नेत्यांनी याबाबत न्याय मिळवून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यांनी त्याबाबत आघाडीतील इतर पक्षाशी नेत्यांनी चर्चा करून काँग्रेसच्या आमदारांवर निधीत अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. निधीबाबत विधीमंडळ अधिवेशनाच्या अगोदर निर्णय होईल, असे मत व्यक्त करून आमदार चौधरी म्हणाले कि अधिवेशनाच्या अगोदर आम्ही कॉंग्रेसचे सर्व आमदार एकत्र येवून चर्चा करू त्यानंतर निश्‍चित त्याबाबत निर्णय होईल. 
Edited  by : Mangesh Mahale      


हेही वाचा : भाजपचे आमदार म्हणतात, "आंधळ दळतय.. कुत्रं पीठ खातयं.."  
 पुणे : "आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातयं.." अशी गत राज्य सरकारची झाली आहे, " अशी टिका भाजपचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. राम सातपुते यांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या धोरणावर टिका केली होती. आजही त्यांनी ट्विट करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सातपुते म्हणाले, "दुधाला दर मिळावा, म्हणून एल्गार आंदोलन केले पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. आज जी दुधाची अवस्था आहे. तीच अवस्था शेतीमालाची आहे. शेतकरी योग्य दर मिळत नाही म्हणून देशोधडीला लागला आहे." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com