कॉम्रेड माधवराव गायकवाडांच्या अंत्यसंस्कारात शासकीय इतमामाचा विसर 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या. मानवंदना देण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले होते. कुटुंबियांना त्याची कल्पना दिली होती. मात्र त्यांनीच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आणि अंत्यसंस्कार उरकला.- भीमराज दराडे, उपविभागीय अधिकारी, येवला.कॉम्रेड माधवराव गायकवाड स्वातंत्र्य सैनिक, विरोधी पक्षनेते होते. त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात व्हायला हवे होते. मात्र प्रशासनाने उदासीनता दाखविली. ही त्यांच्या कार्याची अवहेलना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.- भालचंद्र कांगो, कम्युनिष्ट पक्षाचे नेते.
कॉम्रेड माधवराव गायकवाडांच्या अंत्यसंस्कारात शासकीय इतमामाचा विसर 

मनमाड :  ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसैनिक, विधान परिषदेचे प्रथम विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या पार्थिवावर शेकडो कॉम्रेडस्‌च्या "लाल सलाम'च्या गर्जनेत आज अंत्यसंस्कार झाले. मानसकन्या ऍड साधना गायकवाड यांनी मुखाग्नी दिला.

 भारतीय स्वातंत्र लढा, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ति, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक तसेच माजी विरोधी पक्षनेते अशा पदांवर काम केल्याने त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अपेक्षीत होते. तसे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले होते. मात्र ऐनवेळी प्रशासनाच्या दिरंगाईने ते होऊ शकले नाही. 

स्वातंत्र्यसैनिक गायकवाड यांचे 95 व्या वर्षी सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शेतकरी, कामगार, मजूर, शोषितांच्या संस्था, संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी श्रध्दांजली दिली. 

कॉम्रेड गायकवाड महाराष्ट्राच्या राजकीय, शेतमजुर, कामगार, सामाजिक क्षेत्रात कार्यरत उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. आज सकाळी त्यांच्या निवासस्थानापासुन फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्‍टरमध्ये त्यांचे पार्थिव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ध्वजात गुंडाळुन अंत्ययात्रा निघाली. त्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी होती. नगराध्यक्षा सौ पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, माजी आमदार ऍड जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गटनेते गणेश धात्रक आदींनी पुष्पचक्र वाहिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com