छगन भुजबळ म्हणाले, `आमचं आम्ही पाहून घेऊ`

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आर्थिक गैरव्यावहाराचे आरोप करणारे आमदार सुहास कांदे तासाभरातच त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले.
Chhagan Bhujbal- Suhas Kande
Chhagan Bhujbal- Suhas KandeSarkarnama

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आज सकाळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर आर्थिक गैरव्यावहाराचे (financial eregularity) आरोप करून राज्यभर खळबळ उडवून दिली. मात्र त्यानंतर तासाभरातच झालेल्या भुजबळांच्या बैठकीला ते उपस्थित राहिले. त्यानंतर पत्रकारांनी (He Avoide Journalist) गाठण्याआधीच ते निघून गेले, तर भुजबळ त्यावर पडदा टाकत म्हणाले, `आमचं आम्ही बघून घेऊ`

Chhagan Bhujbal- Suhas Kande
राज म्हणतात, `बाळासाहेबांनी मला जोडे दाखवले`

काल सायंकाळी शिवसेनेचे आमदार व भुजबळांचे विरोधक सुहास कांदे यांनी भुजबळांनी नियजन मंडळाचा निधी परस्पर कंत्राटदारांना देऊन विकला, असा आरोप केला होता. त्याबाबत त्यांनी आपल्याकडे भरपुर पुरावे आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. या आरोपाने राज्यात खळबळ उडाली. महाविकास आघाडीच्या घटकाकडूनच मंत्र्यांविरोधात राजकीय आरोप व खटला दाखल केला जात असल्याने त्याची चर्चा राज्यभर झाली. त्यानंतर काही वेळातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यात मध्यस्थी केली होती. भुजबळ यांनी आमदार कांदे यांना सांभाळून घ्यावे असे विधान केले होते.

Chhagan Bhujbal- Suhas Kande
राऊतांकडून भुजबळांना सल्ला ; आमदार कांदेंना सांभाळून घ्या!

या घडामोडींनंतर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाची आढावा बैठक झाली. या बैठकीस सर्वच आमदार आमंत्रीत होते. आमदार कांदे हे देखील बैठकीला हजर होते. मात्र बैठक संपताच त्यांनी पत्रकारांना टाळत सभागृह सोडले. त्यांना पत्रकारांनी गाठण्याचा प्रयत्न केला असता, ते अक्षरश: गेले. पालकमंत्री भुजबळ यांना या विषयावर विचारले असता, आमचे आम्ही बघून घेऊ. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत. काही मतभेद, वाद असल्यास वरिष्ठ नेत्यांची समिती आहे. ती त्यात तोडगा काढतील` असे सांगत त्यांनीही हा विषय टाळला.

नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद काल पुन्हा उफाळून आला होता. भुजबळांनी नियोजन समितीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार कांदे यांनी केला. यासाठी आता आमदार कांदे यांनी भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. जिल्हा नियोजन समितीतील कामे मर्जीतील ठेकेदारांना देऊन गैरव्यवहार केल्याचा कांदे यांनी गंभीर आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला होता. १४ दिवसांपूर्वी भुजबळ नांदगावच्या पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यावर असतांनाही कांदे आणि भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी यांनी केली होती. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असे स्पष्ट केले होते. मात्र भर बैठकीत आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात बाचाबाची झाली होती.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com