भाजपचं मुंबई प्रेम बेगडी, अमित शहांच्या दौऱ्यावर विरोधीपक्षनेते दानवेंची टीका

Ambadas Danave : शिवसेना कोणती आणि कशी सेना आहे, हे निवडणुकीच्या मैदानातच स्पष्ट होईल.
Opposition Leader Ambadas Danve News
Opposition Leader Ambadas Danve NewsSarkarnama

नाशिक : मुंबईत असलेली अनेक कार्यालये राजधानी दिल्लीला हलवली असती तर एक वेळ समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला, गुजरातला हलवण्यात आली आहेत. याचाच अर्थ भाजपचे मराठी माणसांवरचे प्रेम बेगडी आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा आणि अहमदाबादला (Ahmedabad) ते देण्याचं काम सुरू आहे, अशी टीका विधान परिषदेचे नवनिर्वाचित विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. ते सद्या नाशिक आहेत. (Marathi latest News)

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना, नुकसानग्रस्त वंजारवाडी गाव येथे भेट दिली. यावेळी दानवे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या वावरातच तेथील अधिकाऱ्यांना सुनावले. त्वरीत मदत पोहचवण्याचे त्यांना आदेश दिले. बुलेट ट्रेनच्या कामापेक्षा, सरकारमधल्या नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या बांधावर यावे, अशीही टीका त्यांनी भाजपावर केली आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

Opposition Leader Ambadas Danve News
शेलारांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर ; मराठी शाळा बंद कुणी केल्या, वाझेला वसुलीला कुणी बसवले ?

अमित शाह महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत आहेत. मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं काम शहांनी केले आहे. महाराष्ट्र सोशिक राहिला आहे. या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्र मात करेल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की शिवसेना कोणती आणि कशी सेना आहे, हे आगामी निवडणुकीच्या मैदानातच स्पष्ट होईल. आशिष शेलारच काय सर्व विरोधकांना ते दाखवून देईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Opposition Leader Ambadas Danve News
Sanjay Raut यांचा आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम वाढला

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना, आम्ही अनेक निर्णयांचा पाठपुरावा केला. मात्र राज्यपालांनी काही तत्परता दाखवली नाही. आता मात्र शिंदे-फडणवीसांच्या सरकार आल्यावर प्रलंबित 12 आमदारांच्या यादीवर निर्णय लवकर होणार आहे. यावरून राज्यपालांची तत्परता दिसून येते, असा जोरदार टोला दानवेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे. ज्या निर्णयांसाठी दोन-दोन, तीन-तीन वर्ष वाट पाहावी लागत होती, ते निर्णय दोन-तीन मिनिटांत घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात याविषयी निश्चित भूमिका घेऊ, असा चिमटाही त्यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com