गुलाबराव पाटील म्हणतात निमंत्रण दिलयं... भाजप नेत्यांचा मिळाले नसल्याचा दावा!

भाजपच्या भूमिकेकडे जळगावमध्ये लक्ष
gulabarao patil
gulabarao patil

जळगाव : जळगाव जिल्हा बँक  निवडणूक (Jalgaon district Bank election) बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याचे सांगितले परंतु भाजप नेतेच त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे माहीती मिळाली आहे. त्यामुळे या बैठकीचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत.निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे सध्या जिल्हा बॅंकेवर नेतृत्व आहे. भाजप नेते गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे हे बँकेचे संचालक आहेत.

भाजप आणि एकनाथ खडसे यांच्यातील ताणाचे वातावरण पाहता अश्या स्थितीत भाजप नेते बिनविरोध साठी तयार होणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.  पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बिनविरोधसाठी प्रयत्नशील आहेत,त्यांनी एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे.

बिनविरोध साठी सोमवार (ता.३०)रोजी त्यांनी जळगाव येथील अजिंठा विश्रामगृह येथे दुपारी चार वाजता सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे,सर्व पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील असा त्यांनी दावा केला आहे.
या बैठकीबाबत भाजपची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.मात्र या सर्वपक्षीय बैठकीबाबत भाजप नेते याना माहीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, या बैठकिबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याशी कोणीही संपर्क केला नाही.आमचे नेते गिरीश महाजन यांनी या बाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे त्यांनाही या बाबत आद्याप माहीत नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे या बैठकीबाबत पक्षीय पातळीवर आमची वरिष्ठांशी चर्चा झाली नाही.त्यामुळे बैठकीला जाण्याबाबत आता आपण काहीही सांगू शकत नाही असेही आमदार भोळे यानी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com